IND vs ENG: स्टोक्स-आर्चरसह इंग्लंडचा 15 सदस्यीय ताफा चेन्नईत दाखल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 25 January 2021

 इंग्लंड संघाचे बाकी खेळाडू श्रीलंकेचा दौरा आटोपल्यानंतर वेगवेगळ्या गटासह  27 जानेवारीला श्रीलंकेहून थेट चेन्नईमध्ये रवाना होणार आहेत.

India vs England test Series 2021 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचे 15 सदस्यीय ताफा रविवारीच चेन्नईमध्ये दाखल झाला. अष्टपैलू बेन स्टोक्स, जलगती गोलंदाज जोफ्रा आर्चर रोरी बर्न्स आणइ जोनाथन ट्रॉट यांचा यात समावेश आहे. चेन्नईच्या चॅपॉक स्टेडियमवर रंगणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या काही राखीव खेळाडूंचाही भारतात दाखल झालेल्या ताफ्यात समावेश आहे. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात जी कसोटी मालिका सुरु आहे त्याचा भाग नसलेले हे खेळाडू भारतात होणाऱ्या मालिकेसाचेन्नईत पोहचले आहेत.  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईच्या मैदानात रंगणार आहेत. उर्वरित दोन कसोटी सामन्यासह पाच टी-20 सामन्याची मालिका ही अहमदाबादच्या मैदानात खेळवण्यात येईल. तर 3 सामन्याची वनडे मालिका पुण्यात रंगणार आहे. पहिले दोन कसोटी सामने हे प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळाने घेतलाय. 

अबतक 606 विकेट! जिमी करतोय जम्बोच्या विक्रमाचा पाठलाग

इंग्लंड संघाचे बाकी खेळाडू श्रीलंकेचा दौरा आटोपल्यानंतर वेगवेगळ्या गटासह  27 जानेवारीला श्रीलंकेहून थेट चेन्नईमध्ये रवाना होणार आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी देखील घेण्यात येईल. या सर्व खेळाडूंना क्वारंटाईन प्रक्रियेतून जावे लागणार आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातील खेळाडूसह सदस्य स्टाफला  लीला पॅलेस हॉटेलमध्ये बायो-बबलमध्ये (जैव सुरक्षित वातावरणात) ठेवणअयात येईल.

दोन कसोटी सामन्यासाठी  इंग्लंडचा संघ : 
 

जो रूट (कर्णधार), जॅक क्रॉले, डॅनियल लॉरेंस, डॉमनिक सिब्ले, मोईन अली, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, रोरी बर्न्स, जोस बटलर, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन, डॉमनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, ओली स्टोन. 

दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर. 


​ ​

संबंधित बातम्या