Vijay Hazare Trophy 2021 : BCCI च्या विनंतीवरुन टी-नटराजनला तमिळनाडू संघातून वगळलं

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 11 February 2021

बीसीसीआय आणि भारतीय टिम व्यवस्थानपनाला इंग्लंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी टी नटराजनने फिट रहावे, असे वाटते.

चेन्नई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये पदार्पण करुन अनोखा विक्रम आपल्या नावे केलेल्या टी. नटराजनसंदर्भात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतलाय. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध विजय हजारे ट्रॉफीत टी. नटराजनला खेळवून नये, असे बीसीसीआयने तमिळनाडू संघाला सांगितले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी त्याने तंदुरुस्त रहावे, यासाठी बीसीसीआयने त्याला देशांतर्गत क्रिकेटपासून दूर ठवेले आहे.

टीएनसीएचे सचिव आर एस रामासामी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  बीसीसीआय आणि भारतीय टिम व्यवस्थानपनाला इंग्लंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी टी नटराजनने फिट रहावे, असे वाटते. भारतीय संघाचे हित लक्षात घेऊन आम्ही नटराजनला बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. तमिळनाडूच्या संघाने नटराजनच्या जागी आर एस जगनाथ श्रीनिवास याला संधी दिली आहे. तमिळनाडूचा संघ 13 फेब्रुवारी रोजी इंदुरला रवाना होणार आहे. 

INDvsENG : टीम इंडियाला टोला हाणणाऱ्या वॉनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्याच्या घडीला कसोटी मालिका सुरु आहे. चेन्नईच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसरा कसोटी सामना पुन्हा एकदा त्याच मैदानात रंगल्याचे पाहायला मिळणार आहे. उर्वरित दोन कसोटी सामने अहमदाबादच्या मैदानात रंगणार असून याच मैदानार पाच टी-20 सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिला टी-20 सामना 12 मार्चला खेळवण्यात येणार असून पहिला वनडे सामना 23 मार्चला रंगणार आहे. 

एकच फाईट वातावरण टाईट; पुरुषाला नमवत महिलेनं पटकावलं 1 मिलियनचं बक्षीस (VIDEO)

युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत टी-नटराजनने आपल्या गोलंदाजीनं चांगलेच प्रभावित केले होते. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक यॉर्कर लेंथ चेंडू टाकले होते. या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यात संधी मिळाली. कसोटीसाठी नेट प्रॅक्टिस गोलंदाज म्हणून त्याला संघासोबत थांबवण्यात आले. संघातील प्रमुख गोलंदाजांच्या दुखापतीनंतर त्याने कसोटीतही पदार्पण केले होते. एकाच दौऱ्यात तीन प्रकारात पदार्पण करण्याचा अनोखा विक्रम नटराजनच्या नावे झाला  होता. 


​ ​

संबंधित बातम्या