तो कृष्णा नाही तर 'करिश्मा'; अख्तरने थोपटली प्रसिद्धची पाठ

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 26 March 2021

कृष्णाने वनडे पदार्पणात सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा पराक्रम आपल्या नावे केला होता. पहिल्या सामन्यात त्याने 54 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या होत्या.

इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरुवात करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणजेच पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाजही भारतीय गोलंदाजाचा फॅन झाला आहे. तो कृष्णा नव्हे 'करिश्मा' आहे, अशा शब्दांत शोएब अख्तरने प्रसिद्ध कृष्णावर कौतुकाचा वर्षाव केलाय.  

कृष्णाने वनडे पदार्पणात सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा पराक्रम आपल्या नावे केला होता. पहिल्या सामन्यात त्याने 54 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या होत्या. वनडे पदार्पणात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट मिळवणारा तो पहिला जलदगती गोलंदाज आहे. इंग्लंडचा निम्मा संघ गारद करण्याचा पराक्रम त्याच्या नावे झाला असता पण विराट कोहलीने कृष्णाच्या गोलंदाजीवर सोपा झेल सोडला होता.   

भारत-पाकमध्ये त्रयस्थ ठिकाणी टी-20 मालिका? दुबईतील बैठकीवर खिळल्या नजरा

कर्नाटकच्या युवा गोलंदाजासंदर्भात अख्तर म्हणाला की, तो कृष्णा नव्हे तर 'करिष्मा' आहे. इंग्लंडच्या सलामीवीरांनी सुरुवातीला त्याच्यावर आक्रमण केले. यातून सावरुन त्याने जी कामगिरी करुन दाखवली ती कौतुकास्पद आहे, असे शोएब अख्तरने म्हटले आहे. जलदगती गोलंदाजाकडे एक अ‍ॅटिट्यूड असावा लागतो. सुरुवातीला अधिक धावा खर्च केल्यानंतर आपल्यातील क्षमता सिद्ध करणे सोपी गोष्ट नसते. आगामी सामन्यातही कृष्णाकडून अशीच कामगिरी पाहायला मिळेल, अशी सदिच्छाही शोएबने भारतीय गोलंदाला दिली आहे.  

इंग्लंड विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या तीन षटकात 37 धावा खर्च केल्या होत्या. शोएब अख्तरने आपल्या युट्यूब कार्यक्रमातून कृष्णाला एक खास सल्लाही दिलाय. फलंदाजांने कितीही फटकेबाजी करु  देत पण पेस (गती) कमी करु नकोस, विकेट टू विकेट गोलंदाजी करत राहा, असे शोएब अख्तरने कृष्णाला उद्देशून सांगितले आहे.  


​ ​

संबंधित बातम्या