रुटनं रडवलं; माजी DSP च्या लेकानं थोडा का होईना धीर दिला

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 February 2021

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात दोन विकेट घेतलेला नदीम अंतिम 14 मध्येही नव्हता. मात्र अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला संधी मिळाली.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नेट गोलंदाज म्हणून संघाच्या ताफ्यात सहभागी झालेल्या शाहबाद नदीमला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. कुलदीप यादवला डावलून त्याची वर्णी लागल्याने विराट कोहलीवर गंभीर आरोपही नेटकऱ्यांनी केले. मात्र दुसऱ्या दिवशी त्याच नदीमने सेट झालेल्या इंग्लंडच्या कर्णधाराला तंबूत धाडत भारतीय संघाला थोडा दिलासा दिला. 218 धावा करणाऱ्या ज्यो रुटला नदीमने पायचित केले. शतकाकडे वाटचाल करत असलेल्या बेन स्टोक्सलाचाही त्याने काटा काढला. स्टोक्स 82 धावांवर बाद झाला. या दोन विकेट भारतीय संघासाठी खूप महत्त्वपूर्ण होत्या. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात दोन विकेट घेतलेला नदीम अंतिम 14 मध्येही नव्हता. मात्र अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला संधी मिळाली. कुलदीपला डावलून त्याला पसंती देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या कसोटीमध्येही कुलदीप यादव दुखापतग्रस्त असताना त्याला संधी मिळाली होती. त्याच्यासंदर्भात हा कमालीचा योगायोगच म्हणावा लागेल. 

रूटची भारतातील पाळेमुळे; चेन्नईच्या मैदानात खास विक्रमाला गवसणी

चेन्नई टेस्टमध्ये नदीमला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यानंतर त्याचे वडीलांचा आनंद गगनात मावेना असाच होता. नदीमचे वडील जावेद महमूद हे निवृत्त पोलिस अधिक्षक आहेत. शाहबाज हा नावाप्रमाणे बहाद्दूर आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. ज्यो रुट आणि बेन स्टोक्स या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडत त्याने आपल्या वडिलांचे शब्द खरे करुन दाखवले. 15 वर्षे फर्स्ट क्लास क्रिकेट खेळल्यानंतर त्याने कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल दिड वर्षांनी तो दुसरा सामना खेळत आहे.

पंतने गडबडीत कॅच सोडला; पण यष्टीमागच्या बडबडीत कमी पडला नाही; व्हिडिओ व्हायरल

नदीमनं अश्विनपेक्षा कमी षटके टाकून त्याच्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या. 44 षटकात त्याने 167 धावा खर्च करुन दोन महागड्या ठरत असलेल्या इंग्लिश प्लेयर्संना माघारी धाडले. यात त्याने 4 षटके निर्धाव टाकली. विशेष म्हणजे डावखुऱ्या फिरकीपूने 6 नोबॉलही फेकले. 


​ ​

संबंधित बातम्या