IND vs Eng : सुर्या वेटिंगवर अय्यरच्या जागी पंतला संधी

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 26 March 2021

कुलदीप यादवला संघात कायम ठेवण्यात आले असून या सामन्यात त्याला लक्षवेधी खेळी करुन दाखवण्याचे आव्हान असेल.

India vs England 2nd ODI Pune : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी कोणाला संधी मिळणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. टी-20 नंतर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून सुर्यकुमार यादवचे वनडेत पदार्पण होईल, अशी चर्चाही रंगली होती. पण विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने कसोटी आणि टी-20 आपली क्षमता दाखवणाऱ्या रिषभ पंतला संधी दिली आहे. त्यामुळे वनडे पदार्पणासाठी सुर्यकुमार यादवला आणखी काही काळ वेटिंगवर रहावे लागणार आहे. कुलदीप यादवला संघात कायम ठेवण्यात आले असून या सामन्यात त्याला लक्षवेधी खेळी करुन दाखवण्याचे आव्हान असेल. 


​ ​

संबंधित बातम्या