विद्या बालननंतर पंतच! मैदानात 'एंटरटेंमेंट एंटरटेंमेंट अँण्ड एंटरटेंमेंट' शो

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 February 2021

पहिल्या दिवशीही तो अश्विन, वॉशिंग्टन यांच्या गोलंदाजीवर स्टम्पमागे बडबड करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिले दोन दिवसांत चेन्नईच्या मैदानात भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद होईल, असे काहीच घडले नाही. ज्यो रुटचं द्विशतक आणि त्याला बेन स्टोक्सनं दिलेली तगडी साथ याच्या जोरावर टीम इंग्लंडने 555 धावांचा डोंगरच उभारला आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडल्यामुळे निर्माण झालेली निरव शांततेत ब्रिस्बेन हिरोनं थोडीफार मजाक मस्ती करत सहकाऱ्यांसह सामना पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम केलं.

रूटची भारतातील पाळेमुळे; चेन्नईच्या मैदानात खास विक्रमाला गवसणी

इंग्लंडच्या डावातील 151 व्या षटकात अश्विन गोलंदाजीसाठी आला. स्ट्राइकवर पोप बॅटिंगला होता. रविचंद्रन अश्विनच्या फुलटॉस चेंडूवर पोपने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी चेंडू बॅटची कड घेऊन हवेत उंच उडाला. चेंडू लेग स्लिपच्या मागे जाऊन पडला असताना नॉटी पंतला मजाक करण्याचा मूड झाला आणि तो जणू आपण झेल टिपतोय या तोऱ्यात पुढे पळताना दिसला. दुसरीकडे रोहित शर्मा चेंडू पकडण्यासाठी स्टम्पच्या मागे धावताना दिसले. या चेंडूवर पोप आणि ज्यो रुटने संघाच्या धावफलकात दोन धावांची भर घातली.

पंतने गडबडीत कॅच सोडला; पण यष्टीमागच्या बडबडीत कमी पडला नाही; व्हिडिओ व्हायरल

पंतने केलेली या एक्शनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पंत ज्या पद्धतीने मैदानात मनोरंजन करतोय ते विद्या बालनच्या चित्रपटातील 'एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँण्ड एंटरटेंनमेंट' हा डायलॉग आठवावा असाच आहे. 

पहिल्या दिवशीही तो अश्विन, वॉशिंग्टन यांच्या गोलंदाजीवर स्टम्पमागे बडबड करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. "मेरा नाम है वॉशिंग्टन मुझे जाना है डीसी" हे म्हणतानाचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. विकेटमागून तो गोलंदाजांना प्रोत्साहित करण्याची सध्या चांगलीच चर्चा रंगत असते. काही दिवसांपूर्वी युजी-कुलदीपला जसे माही स्टम्पच्या मागे उभे राहून टिप्स द्यायचा तसाच काहीसा प्रयत्न पंतही करताना दिसतोय. 


​ ​

संबंधित बातम्या