विक्रम पाहून मीच चक्रावतो : अश्विन

सुनंदन लेले
Monday, 15 February 2021

चेपॉकची खेळपट्टी फिरकीला साथ देत आहे. या फलंदाजांना गोलंदाजाचा आदर करणे भाग पडते.

हरभजन सिंगने 2001मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करताना केलेली गोलंदाजी मी पाहिली आहे. त्या वेळी मी फक्त फलंदाज होतो. मी त्या वेळी प्रमुख ऑफ स्पीनर गोलंदाज होईन, असे वाटले नव्हते. माझी गोलंदाजीची शैली बघून सहकारी मला हसायचे. हे लक्षात घेता मी दोनशे डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला आहे. भारतात सर्वाधिक विकेट घेणारा ऑफ स्पीन गोलंदाज मी आहे, हे विक्रम माझ्या नावावर जमा आहेत, हे ऐकून मजा वाटते. कधीकधी माझे विक्रम पाहून मीच चक्रावतो, असे अश्विनने सांगितले. 

INDvsENG : अश्विननं पाहुण्या इंग्लंडची जिरवली; मैदानाबाहेर भज्जीनं घेतली ईशाची फिरकी

चेपॉकची खेळपट्टी फिरकीला साथ देत आहे. या फलंदाजांना गोलंदाजाचा आदर करणे भाग पडते. या वेळी कोणते फटके मारणे आपल्याला जमेल. धावा करताना पायांचा वापर करायचा की स्वीपचा, हे ज्याचे त्याने ठरवावे, असे अश्विनने सांगितले. इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांना सतत दडपणाखाली ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो.

Ind vs En 2nd Test : अश्विनचा पंजा; 134 धावांतच इंग्लंडचा खेळ खल्लास!

अक्षर पटेलला प्रथम श्रेणी सामन्यांचा भरपूर अनुभव आहे. त्याचा त्याला फायदा झाला. पहिल्याच कसोटीत त्याने ज्यो रूट आणि मोईन अलीला बाद केले. कुलदीप यादव दीर्घ कालावधीनंतर खेळत आहे. त्याला स्थिरावायला थोडा वेळ नक्कीच लागेल. पाच गोलंदाज संघात असताना एखाद्या गोलंदाजास थोडी उशिराने गोलंदाजी करायला मिळणे स्वाभाविक आहे, असेही तो म्हणाला. 

 


​ ​

संबंधित बातम्या