पुण्यातील एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना होणार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 February 2021

महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्व सावधगिरी बाळगून आणि प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देऊ  नये या अटींवर या लढती महाराष्ट्रात घेण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी  दिली आहे.

पुणे : पुण्यात गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध होणारे एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामन्यांना परवानगी दिली; परंतु सर्व काटेकोर उपाययोजना करण्याच्या सूचना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला दिल्या आहेत.
मालिकेतील तिन्ही एकदिवसीय सामने महाराष्ट्रात व्हावेत, यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर, मुंबई क्रिकेट संघटनेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

INDvsENG...तर पराभूत इंग्लंडच्या संघाला दोन गुण मिळतील; भारतावर टांगती तलवार

महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्व सावधगिरी बाळगून आणि प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देऊ  नये या अटींवर या लढती महाराष्ट्रात घेण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी  दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी विकास काकतकर यांना खेळाडू आणि अधिकाऱ्यांची पुरेशी काळजी घेण्याचीही विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून परवानगी मिळाल्याने आता महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुढील तयारीला लागली आहे. सामन्यांच्या संयोजनात शरद पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्यामुळे काकतकर यांनी पवार यांचे आभार मानले आहेत.
 


​ ​

संबंधित बातम्या