INDvsENG : पुण्यातील वनडे मालिकेतील सामन्यांसाठी प्रेक्षकांना 'नो एन्ट्री'

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 March 2021

राज्य सरकारने कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रेक्षकांशिवाय सामने खेळवण्यास महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला परवानगी दिली होती.

पुणे : इंग्लंडविरुद्ध पुण्यात होणारे तिन्ही एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना होणार आहेत. मोजक्‍या प्रेक्षकांना संधी देण्याचा विचार झाला तरी आता वेळ कमी असल्यामुळे ते शक्‍य होणार नाही, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाझ बागवान यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर 23, 26 आणि 28 मार्च रोजी हे तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. राज्य सरकारने कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रेक्षकांशिवाय सामने खेळवण्यास महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला परवानगी दिली होती.  तिन्ही सामन्यांच्या आयोजनाची तयारी पूर्ण होत असल्याचेही बागवान यांनी सांगितले.

INDvsENG 1st T20 : रिषभ पंतची निवड होणार? संघ निवडताना तारेवरची कसरत 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईच्या मैदानातील पहिल्या पराभवानंतर उर्वरित तिन्ही सामने जिंकत भारतीय संघाने इंग्लंडला चारीमुंड्याचित केले. कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीमुळे चार सामन्यांची कसोटी मालिका ही  चेन्नई आणि अहमदाबाद या दोन शहरात खेळवण्यात आली होती. या दोन्ही संघामध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या मैदानात रंगणार आहे. चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यानंतर  मर्यादित संख्येनं प्रेक्षकाना परवानगी देण्यात आली होती. 

लखनऊच्या मैदानातून भारतीय महिला क्रिकेट अनलॉक झाले. या सामन्यासाठीही प्रेक्षकांना एन्ट्री मिळाली आहे. एवढेच नाही तर रायपूरच्या मैदानात सुरु असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमधील सामन्यालाही मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश मिळाल्याचे पाहायला मिळाले. मात्र हे चित्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात दिसणार नाही.


​ ​

संबंधित बातम्या