INDvsENG : "...तर टीम इंडियाचे गुण कमी करावेत"

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 1 March 2021

आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाला मिळालेले गुण कपात व्हावे, असा उल्लेख त्याने केलाय.   

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी पाहुण्या संघाच्या माजी फिरकीपटूने खेळपट्टीसंदर्भात मोठे विधान केले आहे. जर अहमदाबादच्या मैदानातील खेळपट्टी पुन्हा फिरकीला साथ देताना दिसली तर भारतीय संघाचे गुण कपात करण्याची कारवाई व्हायला हवी. खेळपट्टीच्या मुद्यावरुन आयसीसीने हस्तक्षेप घेऊन योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे, असे मॉन्टी पानेसर या फिरकीपटूने म्हटले आहे.  आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाला मिळालेले गुण कपात व्हावे, असा उल्लेख त्याने केलाय.   

एएनआयच्या वृत्तानुसार, पानेसर म्हणाला की,  पुन्हा एकदा फिरकीला मदत मिळणारी खेळपट्टी तयार करण्यात आले तर आयसीसीने भारतीय टीमवर कारवाई करायला हवी. क्रिकेटसाठी जगातील सर्वात मोठे मैदान मिळाले ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. पण पिच क्यूरेटरने या मोठ्या मैदानाला बदनाम करण्याजोगी खेळपट्टी तयार करु नये. या मैदानावर फिरकीला मदत मिळते हे खरे असले तरी ज्याप्रमाणे तिसऱ्या कसोटीत फिरकीपटूंना जशी साथ मिळाली. तसा प्रकार पुन्हा घडू नये याची पिच क्यूरेटरने काळजी घ्यावी. पुन्हा तिच चूक निदर्शनास आल्यास आयसीसीने कठोर पावले, उचलण्याचा निर्णय घ्यावा लागले. 

IND vs ENG: टीम इंडियाची 'माफिया गँग'; कॅप्टनसह अश्विनचा समावेश असणारा फोटो व्हायरल

चेन्नईत रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर अहमदाबादच्या मैदानाली खेळपट्टीवरुन वाद निर्माण झाला आहे. या दोन्ही खेळपट्टीवर फिरकीची जादू पाहायला मिळाली होती. इंग्लंडच्या संघाने खेळपट्टीसंदर्भात कोणत्याही प्रकारे अधिकृत तक्रार केलेली नाही. इंग्लंड संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले होते. मात्र आता मॉन्टी पानेसरने खेळपट्टीच्या मुद्यावरुन मोठे वक्तव्य केले आहे. 

भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल. या सामन्यात मोठी उलथापालथ झाली आणि इंग्लंडने मालिका बरोबरीत सोडवली तर भारतीय संघाचे स्थान धोक्यात येऊ शकते. यादरम्यान खेळपट्टी कशी आणि कोणाला साथ देणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.  


​ ​

संबंधित बातम्या