IND vs ENG: टीम इंडियाच्या ड्रेसिंगरुममध्ये फायटिंग; शास्त्रींनी केलं दुर्लक्ष (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 7 February 2021

बाकावर बसवण्यात आलेल्या दोघांचा व्हिडिओनंतर ड्रेसिंगरुमधील खेळाडूंच्या वादाची चर्चा जोर धरत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सिराज आणि कुलदीपला बाकावर बसवण्यात आले. सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करुनही ईशांतला संधी देण्यात आली. यावरुन तो चर्चेत आला होता. दुसरीकडे नदीपच्या ऐवजी कुलदीपला संधी मिळायला हवी होती, अशी चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर ही जोडी आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर भारतीय ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांच्यात वादावादी सुरु असल्याचे दिसते. रागाने कुलदीपकडे पाहत सिराजने थेट कुलदीपची कॉलर पकडल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री दुर्लक्ष करताना दिसते. ज्यावेळी या दोघांच्यामध्ये बाचाबाची सुरु असल्याचे चित्र दिसते त्यावेळी ते सामना पाहण्यात मग्न असल्याचे पाहायला मिळते.  

INDvsENG : पंत-पुजाराची शतकी भागीदारी थोडासा दिलासा देणारी

या दोन्ही खेळाडूंच्यामध्ये खरंच कोणत्या कारणावरुन वाद झाला की ते मजाक मस्तीमध्ये तसे करत होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र बाकावर बसवण्यात आलेल्या दोघांचा व्हिडिओनंतर ड्रेसिंगरुमधील खेळाडूंच्या वादाची चर्चा जोर धरत आहे. या प्रकरणात कर्णधार किंवा संघ व्यवस्थापन काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 


​ ​

संबंधित बातम्या