ICC WTC POINT TABLE : टीम इंडियाला मोठा धक्का, इंग्लंड टॉपला

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 9 February 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील  चार सामन्यांची कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

घरच्या मैदानावर इंग्लंडकडून मोठ्या फरकाने झालेल्या पराभवाचा टीम इंडियाला मोठा दणका बसला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमच्या क्रमावारीत भारताची घसरण झाली असून इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान झालाय. चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 227 धावांनी पराभूत करत इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

INDvsENG 1st Test : चेन्नईचं मैदान मारत इंग्लंडने दिले 'लगान' वसूल करण्याचे संकेत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील  चार सामन्यांची कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. न्यूझीलंडच्या संघाने फायनल गाठली असून त्यांच्यासोबत कोण खेळणार याचे चित्र भारत-इंग्लंड यांच्यातील मालिका निकालावर अवलंबून असणार आहे. 

चेन्नई कसोटीतील विजयासह इंग्लंडच्या नावे 442 गुण जमा झाले आहेत. 70.2 विनिंग पर्सेंटेजसह संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. न्यूझीलंड 420 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया 332 गुणांसह तिसऱ्या आणि  भारतीय संघ 430 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची समीकरण बदलली होती. न्यूझीलंडचा संघ फायनल खेळण्याचे निश्चित झाले. इंग्लंडविरुद्धच्या पहिलया कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया अव्वलस्थानी होते. मोठ्या फरकाने सामना गमावल्यानंतर समीकरण एकदमच उलटे झाले आहे. जर-तरच्या समीकरणात ऑस्ट्रेलियाही शर्यतीत आहे.


​ ​

संबंधित बातम्या