प्रतिकूल परिस्थितीत शांत राहणे फायदेशीर - राहुल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 March 2021

काहीही झाले तरी मेहनतीत कमी पडायचे नाही. दरवेळी सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत

पुणे :  ऑस्ट्रेलियात रंगत चाललेल्या कसोटी मालिकेतून मनगटाच्या दुखापतीने मला बाहेर पडावे लागले होते ज्याचे खूप वाईट वाटले होते. मनगटाच्या दुखापतीतून सावरून भारतीय संघात साडेतीन महिन्यांनी परतलो तेव्हा काही सामन्यांत अपयश आले याची खंत वाटली, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना यश-अपयश पचवायची ताकद असावीच लागते.

काहीही झाले तरी मेहनतीत कमी पडायचे नाही. दरवेळी सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खेळाडूने आत्मविश्‍वास कायम ठेवणे गरजेचे असते. मीही तेच करायचा प्रयत्न केला, के.एल. राहुल पत्रकारांशी बोलताना म्हणाला. टी-20 मालिकेत अपयश आल्यानंतरही मी शांत राहायचा प्रयत्न केला. डोके शांत ठेवले तरच सारासार आणि सकारात्मक विचार करून मी चांगला खेळ परत करू शकतो. शांत राहण्याचे फायदे होतात.

IPL च्या तयारीसाठी धोनीच्या CSK ची मुंबईला पसंती; जाणून घ्या प्लॅन

संघातील ज्येष्ठ खेळाडूंकडून मी हेच तर शिकलो आहे. यश मिळो वा अपयश संयम सोडता कामा नये आणि पाय जमिनीवर ठेवलेच पाहिजेत, असे सांगून राहुल म्हणाला, वरून मी शांत दिसलो तरी आतून चांगली कामगिरी करायला पेटून उठलेला असतो. त्याचमुळे गेल्या सामन्यात संघाला गरज असताना मी आणि कृणाल चांगली भागीदारी करू शकलो याचे समाधान मिळाले.

प्रसिद्ध कृष्णाचे कौतुक करताना राहुल म्हणाला, त्याने केलेल्या जोरदार पदार्पणाचे मला अजिबात आश्‍चर्य वाटले नाही. त्याच्या गोलंदाजीत काय ताकद आहे याची मला पूर्ण कल्पना होती, कारण तो आणि मी कर्नाटक संघातून एकत्र खेळत आलो आहोत.असे राहुल म्हणाला.
 


​ ​

संबंधित बातम्या