FAB 4 मधील वातावर टाइट; ज्यो देतोय केन-स्मिथ-कोहली तिकडीला फाईट

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 February 2021

ज्यो रुटने आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून देत विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, आणि केन विलियमसन यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.  

मॉडर्न कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या फलंदाजांतून ज्यो रुटला वगळा असा सूर क्रिकेट वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत होता. मात्र ज्यो रुटने आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून देत विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, आणि केन विलियमसन यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.  सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमध्ये या चार नावांशिवाय पुढे जाता येत नाही. मात्र मागील दोन वर्षांत ज्यो रुटच्या भात्यातून धावा झाल्याचे पाहायला मिळाले नाही. त्यामुळे त्याचे नाव चार आघाडीच्या फलंदाजांमध्ये (FAB 4) मध्ये घेण्यात काही अर्थ नाही, असा सूर उमटला. पण ज्यो इज बॅक... असं काहीसं चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. 

2019 आणि 2020 दोन वर्षात ज्यो रुटला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. एशेज मालिकेत तो अपयशी ठरल्यानंतर त्याच्यावर टिकाही झाली. पण आता तो पुन्हा आपल्या तोऱ्यात परतलाय. 2021 या नव्या वर्षात त्याने धमाकेदार सुरुवात केली आहे. सातत्याने मोठी खेळी करुन त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित करुन सोडले आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याने द्विशतकी खेळी केली. दुसऱ्या कसोटी सामन्यात दीड शतक आणि भारत दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात 218 धावा या त्याला दिग्गजांच्या पक्तींत आणून बसवण्यास पुरेशा आहेत.  

रूटची भारतातील पाळेमुळे; चेन्नईच्या मैदानात खास विक्रमाला गवसणी

FAB-4 च्या शर्यतीत सध्याच्या घडीला  केन विलियमसन आघाडीवर आहे. स्मिथ आणि विराट कोहलीनंतर आता ज्यो रुटही त्याला चॅलेंज देण्यास सज्ज झाला. वर्षातील पहिल्या तीन कसोटी सामन्यात जो रुटने दोन द्विशतकासह एक शतकी खेळी केली आहे. यात त्याने 600+ धावा केल्या आहेत.  

पंतने गडबडीत कॅच सोडला; पण यष्टीमागच्या बडबडीत कमी पडला नाही; व्हिडिओ व्हायरल

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत केन विलियमसन 919  गुणांसह टॉपला आहे. त्याच्या पाठोपाठ स्टीव्ह स्मिथ 891 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून मार्नस लाबुशेन तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने विराट कोहलीची जागा घेतली आहे. लाबुशेनच्या नावे 878 गुण असून विराट कोहली 862 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. ज्यो रुट 823 गुणांसह पाचव्या क्रमांकावर असून भारता विरुद्धच्या द्विशतकानंतर तो पुन्हा भरारी घेत स्मिथ-कोहली आणि विलियमसन या तिकडीला चॅलेंज देताना दिसेल.


​ ​

संबंधित बातम्या