INDvsENG : जगातील सर्वात मोठ्या मैदानात रंगणारा सामना ईशांतसाठी खास असेल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

प्रकाशझोतात होणाऱ्या कसोटी सामन्यात उसळत्या चेंडूंचा सामना करणार का, या प्रश्‍नावर ईशांत शर्मा म्हणाला, या प्रश्‍नाचे उत्तर आत्ता देऊ शकत नाही; पण आमच्याबरोबर इंग्लंडचेही गोलंदाज याचाच विचार करत असतील.

अहमदाबाद :  खेळपट्टीबाबतचा संभ्रम... प्रकाशझोतातील खेळपट्टी... समोर कोणतीही परिस्थिती आली, तरी आमचे फलंदाज त्याचा सामना करण्यास सक्षम आहेत, असा विश्‍वास 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या ईशांत शर्माने व्यक्त केला. बुधवारपासून मोटेरा स्टेडियमवर सुरू होणारा भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना ईशांत शर्माचा 100 वा कसो सामना असेल.

प्रकाशझोतात होणाऱ्या कसोटी सामन्यात उसळत्या चेंडूंचा सामना करणार का, या प्रश्‍नावर ईशांत शर्मा म्हणाला, या प्रश्‍नाचे उत्तर आत्ता देऊ शकत नाही; पण आमच्याबरोबर इंग्लंडचेही गोलंदाज याचाच विचार करत असतील. स्टेडियम नवे असले आणि बऱ्याच काळानंतर येथे कसोटी सामना होत असला, तरी आम्ही अडचणीत येऊ असे वाटत नाही. काही गोष्टी आमच्यासाठीही नव्या आहेत; परंतु आमचे फलंदाज कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास समर्थ आहेत.

आम्हीही उत्सुक

मोटेरा स्टेडियमबाबत बोलताना ईशांत म्हणाला, क्रिकेटविश्‍वातील हे सर्वात मोठे स्टेडियम आहे. त्यामध्ये होत असलेल्या सामन्यात खेळण्यास आम्हीसुद्धा उत्सुक आहोत, खेळपट्टी नेमकी कशी, असेल, वातावरण कसे असेल, याबाबत काहीही सांगता येणार नाही, प्रकाशझोतातील दिव्यांची रचना वेगळी आहे. खेळपट्टी कशीही असली, तरी आम्हाला अचूक दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. 

नुकताच 300 कसोटी विकेटचा टप्पा पूर्ण करणाऱ्या ईशांतने सर्वाधिक कसोटी विकेट इंग्लंडविरुद्ध मिळवले आहेत, याबाबत विचारले असतो तो म्हणाला, या आकडेवारीबाबत मला माहिती नाही. मी फक्त समोर असलेल्या फलंदाजांना कसे बाद करायचे, याचाच विचार करत असतो.
 


​ ​

संबंधित बातम्या