लंबूजी ईशांत 'शंभर नंबरी' ठरेल ही कल्पनाही कुणी केली नसेल (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 24 February 2021

ईशांत शर्मा  100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.  

शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या ईशांत शर्माने सिब्लेच्या रुपात पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला. शंभर नंबरी ईशांतने त्याला खातेही उघडण्याचा अवधी दिला नाही. तिसऱ्या आणि महत्वपूर्ण कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावली. ज्यो रुटने नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय फोल ठरवला. सुरुवातीलाच ईशांतने सलामीवीर सिब्लेला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. त्याच्यापाठोपाठ अक्षर पटेलनं जॉनी बेयस्ट्रोला माघारी धाडत पाहुण्या संघाला बॅकफूटवर आणले.  

अहमदाबादमधील भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यााल खूपच महत्त्व आहे. जगातील सर्वात मोठ्या मैदानावर हा सामना खेळवण्यात येत आहे. ईशांत शर्मा  100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.  भारतीय संघात मोजके गोलंदाज आहेत ज्यांनी शंभर कसोटी सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे जलदगती गोलंदाजांमध्ये कपिल देव यांच्यानंतर शंभरी पूर्ण करणारा ईशांत हा दुसरा जलदगती गोलंदाज आहे.  यांच्याशिवाय फिरकीपटू अनिल कुंबळे (132) आणि हरभजन सिंग(103) कसोटी सामने खेळले आहेत.  कपिल देव यांच्या नावे 131 कसोटी सामन्यांची नोंद आहे. 

2007 च्या बांग्लादेश दौऱ्यात किरकोळ शरिरयष्टी असलेल्या गोलंदाजांने आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवा केली. त्यावेळी झहिर खान याचा पंजामुळे त्याची विकेट किरकोळ अशीच होती. भारतीय संघाने  बांगलादेशला फॉलोऑन देऊन मोठा पराभव केला असला तरी ईशांतला फार काही संधी मिळाली नव्हती. त्याने आपल्या वेगाने सर्वांनाच प्रभावित केले. पण लंबा गडी लंबे रेस का घोडा ठरेल, असे कुणालाच वाटले नव्हते. याच कारण जलदगती गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या दुखापतीच्या ग्रहणात तो झाकाळला जाईल, असेच वाटत होते. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेत त्याने कसोटीवर फोकस केले आणि असाध्य वाटणारी गोष्ट त्याने साध्य करुन दाखवली. 

किंग कोहली म्हणाला, ईशांतच्या लांब केसांचेही कौतुकच वाटते

2011 मध्ये पर्थ कसोटी सामन्यात प्रति तास 152 किलोमीटर वेगाने रिक पॉंटिंगला टाकलेला बॉल हा ईशांतच्या करिअरमधील सर्वात वेगवान बॉल होता.  99 कसोटीनंतर ईशांतच्या नावे 302 विकेट आहेत. पाच वेळा फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा त्याने 11 वेळा केलाय. आणि 74 रन देत 7 विकेट मिळवणे ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली आहे. ही कामगिरी त्याने इंग्लंडविरुद्धच नोंदवली आहे.  वऩडे क्रिकेटमध्ये केवळ 80 सामन्यात संधी मिळाली आहे. तेथे त्याने 115 विकेट त्याच्या नावे आहेत.  आपीएलमध्ये 90 मॅच इशांत खेळला असून तो दिल्ली संघाचे नेतृत्व करत असून त्याच्या नावे 70 विकेट आहेत. अनेक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या इशांतला 2018 मध्ये कोणत्याही आपीएल संघाने खरेदी केले नव्हते. आपल्या करिअरमध्ये अनेक चढ उतारा पाहणाऱ्या दिल्लीच्या या मुलाने 100 कसोटी खेळण्याचा विक्रम करत कोणतेही गोष्ट अशक्य नाही. हेच दाखवून दिलं आहे.  


​ ​

संबंधित बातम्या