बॅटिंग-बॉलिंगनंतर डान्सिंग मूड, अश्विनसोबत पांड्या-कुलदीपनेही धरला ठेका (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 20 February 2021

24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी सराव आणि इतर गोष्टींसोबत टीम इंडियातील खेळाडू धमाल मस्तीच्या मूडमध्ये दिसले.  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या मैदानात रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत. 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी सराव आणि इतर गोष्टींसोबत टीम इंडियातील खेळाडू धमाल मस्तीच्या मूडमध्ये दिसले.  

जिममध्ये वर्कआउट करत असताना अश्विन, हार्दिक पांड्या आणि कुलदीप एका गाण्यावर डान्स करताना दिसले. अनुभवी अष्टपैलूने पहिल्यांदा स्टेपला सुरुवात केली आणि त्याच्यापाठोपाठ हार्दिक आणि चायनामन स्पेशलिस्ट कुलदीप यादव यांनी त्याला साथ देण्यात सुरुवात केली. अश्विनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashwin (@rashwin99)

भारत-इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या मैदानात रंगले होते. यानंतर आता उर्वरित दोन्ही सामने अहमदाबादच्या मैदानात रंगणार आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 अशी बरोबरी साधत मालिकेत बरोबरी केली आहे. भारतीय संघाने पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या  सामन्यात दिमाखात कमबॅक केले होते.  अश्विनने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने गोलंदाजीत 8 विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात शतकी खेळी करत कसोटीतील पाचवे शतक झळकावले होते. 


​ ​

संबंधित बातम्या