INDvsENG : फिल्डिंग करता करता बेन स्टोक्सनं केले 'खाली डोकं वर पाय'

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 15 February 2021

पहिल्या डावात इंग्लंडच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. त्यात बेन स्टोक्सने 18 धावा केल्या होत्या.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळाशिवाय खेळाडूंच्या खास अंदाजाची चर्चा रंगताना दिसते. भारतीय संघाचा विराट कोहली चाहत्यांना शिटी आणि टाळ्या वाजवण्याचे आव्हान करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर आता इंग्लिश ताफ्यातील अष्टपैलू बेन स्टोक्स चर्चेत आलाय. 

क्षेत्ररक्षणावेळी तो आपल्या हातावर चालण्याची कसरत करताना पाहायला मिळाले.  फिल्डिंग करता करता   'खाली डोकं वर पाय' या सीनचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चेन्नईच्या मैदानातील प्रेक्षकांनीही त्याला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. इंग्लिश क्रिकेट आयपीएलमध्ये खेळतो. त्यामुळे त्याचा भारतातही त्याचे विशेष चाहते आहेत. 

INDvsENG : पंतनं मैदानातच खाल्ली रोहितची 'थप्पड', सेहवागनं शेअर केला व्हिडिओ

पहिल्या डावात बेन इंग्लंडचा संघ अवघ्या 134 धावांत आटोपला होता. केवळ चार फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. त्यात बेन स्टोक्सने 18 धावा केल्या होत्या. रविचंद्रन अश्विनने बेन स्टोक्सला बाद केले होते. बाद झाल्यानंतर स्टोक्सने आपल्या हेल्मेटवर राग काढल्याचेही पाहायला मिळाले. याशिवाय बेन स्टोक्स आणि पंत यांच्यातील वादही चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. पहिल्या डावात पंत फलंदाजी करत असताना बेन स्टोक्सने त्याला डिवचण्याचा प्रकार केला होता. या दोघांमध्ये शाब्दिक वादही रंगला. पंचांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता.  

पाहुण्या इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेतली. पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड करुन मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात इंग्लंडला थोडक्यात आटोपून भारतीय संघाने दुसऱ्या डावात 400+ धावांची आघाडी घेतली आहे.


​ ​

संबंधित बातम्या