फिरकीपटूंनी इंग्लिश फलंदाजांना नाचवले; पीटरसनची नेटकऱ्यांनी जिरवली

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 24 February 2021

मोटेराची खेळपट्टी ही टॉस जिंका मॅच जिंका यासाऱखी असू नये, असे ट्विटर पीटरसनने केले. 

भारता विरुद्धच्या  डे नाईट कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार ज्यो रुटनं नाणेफेक जिंकली. त्याने टॉस जिंकल्यावर माजी कर्णधार पीटरसनचा आनंद हा गगनात मावेना असाच होता.  नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागल्यावर पीटरसनने खेळपट्टीच्या मुद्यावरुन हिंदीमध्ये ट्विट करत भारतीयांना टोला लगावला. मोटेराची खेळपट्टी ही टॉस जिंका मॅच जिंका यासाऱखी असू नये, असे ट्विटर पीटरसनने केले. 

दुसरीकडे इंग्लंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याता हा निर्णय फोल ठरला. इंग्लंडच्या फंलदांनी पुन्हा एकदा फिरकीपुढे नांगी टाकली. शंभर धावात संघाने 8 विकेट गमावल्या. भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडच्या संघाला नाचवल्यानंतर भारतीय चाहत्यांनी पीटरसनला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेक मिम्सच्या माध्यमातून नेटकरी त्याच्या ट्विटरवर रिप्लाय देताना दिसले.  

इंग्लंडच्या संघाचा सलामीवीर झॅक क्राउलीच्या 53 धावा वगळता एकाही गड्याला मैदानात तग धरता आला नाही. प्रत्येकजण हजेरी लावून परततोय असाच काहीसा सीन पाहायला मिळाला. इंग्लंडच्या फलंदाजांची झालेली गोची भारतीय चाहत्यांच्या आनंद द्विगुणित करणारी होती. भारतीय गोलंदाजांनी पहिले सत्र गाजवल्यानंतर पीटरसनला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केले. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल हा फिरकीच्या जोरावरच लागण्याची चिन्हे पहिल्या दिवसांपासूनच दिसायला लागली आहेत. टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाला 112 धावांत आटोपले असून भारतीय संघ बॅटिंगला उतल्याचे पाहायला मिळाल. रात्रीच्या वेळी पिंक चेंडूवर टीम इंडियाची फलंदाज कसे खेळणार? हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.  


​ ​

संबंधित बातम्या