शास्त्री गुरुजींकडून टीम इंडियाचे प्रबोधन

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 3 February 2021

भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील दिमाखदार विजयानंतर इंग्लंड विरुद्ध चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियातील अशक्यप्राय वाटणाऱ्या मालिका विजयानंतर संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली होती.

चेन्नई :  विलगीकरण संपल्यानंतर मंगळवारी सकाळपासून भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सराव सुरू केला. मार्गदर्शक रवी शास्त्री यांनी सरावाअगोदर सर्व खेळाडूंशी ऊर्जा वाढवणारा संवाद साधला. सहा दिवसांचे विलगीकरण, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर संपले. विराटसह काही खेळाडूंनी काल सायंकाळी वॉर्मअप केला. मात्र आज सकाळपासून प्रत्यक्ष सरावास सुरुवात झाली. त्याअगोदर शास्त्रींनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्पूर्तिदायी संवाद साधण्यात शास्त्री यांचा हातखंडा आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील दिमाखदार विजयानंतर इंग्लंड विरुद्ध चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियातील अशक्यप्राय वाटणाऱ्या मालिका विजयानंतर संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली होती. ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक विजयानंतर शास्त्रींनी संघातील खेळाडूंना ऐतिहासिक भाषण चांगलेच व्हायरल झाले होते. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्यांदा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचे मैदानात मारले होते. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शास्त्री संघासोबत होते. यावेळी टीम इंडियाला कमाल दाखवता आली नव्हती. त्यावेळी त्यांच्यावर टीकाही झाली मात्र ऑस्ट्रेलियात त्यांनी या दोन्ही दौऱ्यांची उणीव भरुन काढण्याचे काम निश्चितच केले.

कोरोनामुळे खेळाला ब्रेक लागल्यानंतर यातून सावरुन भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला आवरुन दाखवले. अजिंक्य रहाणेचं नेतृत्व, पदार्पणात दमदार कामगिरी करणारे त्याचे शिल्लेदार यांच्यासह पडद्यामागे भूमिका साकारणाऱ्या शिल्पकारांमध्ये रवि शास्त्री यांच्या नावाचा समावेश होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्या निश्चित झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक टीम इंडियाच्या शिलेदारांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्द रणनिती आखली. स्मिथसारख्या खेळाडूंना कसे रोखायचे याचा प्लॅन आखण्यात शास्त्रींचा रोल महत्त्वाचा होता. आता इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील असेल. इंग्लंड विरुद्दच्या चार सामन्यांपैकी पहिले दोन सामने चेन्नईच्या मैदानात रंगणार आहेत.


​ ​

संबंधित बातम्या