INDvsENG विराट BCCI ची वकिली करतोय का? कूकचा संतप्त सवाल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 26 February 2021

माजी क्रिकेटर म्हणाला की, अहमदाबादच्या मैदानात भारतातील इतर खेळपट्टीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात चेंडू वळल्याचे पाहायला मिळाले. बरेच चेंडू सरळ गेले. जे चेंडू वळले ते अतिप्रमाणात टर्न झाल्याचे पाहायला मिळाले.  स्किड होताना स्पिन दिसत नाही. पण ज्यावेळी टप्पा पडतो तेव्हा खूपच टर्न मिळाल्याचे दिसले, असे सांगत कूकने खेळपट्टीवर ताशेरे ओढले आहेत.  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना दुसऱ्या दिवशीच संपला. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियवरील निकालानंतर खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थिती होत असताना कर्णधार विराट कोहलीने 10 गडी राखून मिळालेल्या विजयाचे श्रेय फिरकीपटूंना दिल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही खेळपट्टीवर फलंदाजांनी क्षमता दाखवली नाही, असे विराट कोहली म्हणाला. त्याच्या वक्तव्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज कसोटीपटू एलस्टर कूकने नाराजी व्यक्त केली आहे.  

इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाने विराटवर निशाणा साधला आहे. कोहली बीसीसीआयचा प्रवक्ता असल्यासारखे बोलला, अशा शब्दांत कूकने विराटच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. अहमदाबादच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे मुश्किल होते. खेळपट्टीचा मुद्दा बाजूला ठेऊन फलंदाजांना दोषी ठरवणे चुकीचे आहे, असेही कूकने म्हटले आहे.  

17 वर्षांचा प्रवास 900 हून अधिक विकेट; जलदगती गोलंजाचा क्रिकेटला रामराम

कूक म्हणाला, “ तुमच्याकडे विराट कोहली आहे, जो रूट आहे, फिरकीला खेळणारे उत्तम फलंदाज आहेत. इंग्लंडच्या संघात फिरकीला संघर्ष करणारे खेळाडू निश्चितच आहेत. पण फिरकीला उत्तम खेळणारे काही खेळाडूही आहेत. त्यांचाही याठिकाणी निभाव लागला नाही. लाल चेंडूवर ही खेळपट्टी कशी खेळेल हे पाहावे लागेल, असेही कूकने म्हटले आहे.  माजी क्रिकेटर म्हणाला की, अहमदाबादच्या मैदानात भारतातील इतर खेळपट्टीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात चेंडू वळल्याचे पाहायला मिळाले. बरेच चेंडू सरळ गेले. जे चेंडू वळले ते अतिप्रमाणात टर्न झाल्याचे पाहायला मिळाले.  स्किड होताना स्पिन दिसत नाही. पण ज्यावेळी टप्पा पडतो तेव्हा खूपच टर्न मिळाल्याचे दिसले, असे सांगत कूकने खेळपट्टीवर ताशेरे ओढले आहेत.  

 INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​

तिसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीचे वर्चस्व राहिले. सामना अवघ्या दोन दिवसांत निकाली लागला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव112 धावांत  आटोपला.  भारतीय संघ घरच्या मैदानावर दोनशेपार सहज पोहचेल अशी परिस्थिीती असताना ज्यो रुटसारख्या पार्ट टाईम स्पिनरने अर्धा संघ गारद केल्याचे पाहायला मिळाले. भारताचा पहिला डाव देखील 145 धावांत आटोपला होता. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 81 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाल 49 धावांचे आव्हान मिळाले. ते भारतीय संघाने 10 गडी राखून पार केले.


​ ​

संबंधित बातम्या