INDvs ENG : पहिल्यांदाच किंग कोहली- हिटमॅन रोहितसोबत ओपनिंगला

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 20 March 2021

पहिल्यांदाच रोहित शर्मासोबत कॅप्टन किंग कोहली ओपनिंग करताना पाहायला मिळणार आहे.    

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यााच निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या सामन्यात आणखी एक बदल केल्याचे पाहायला मिळाले. यॉर्कर स्पेशलिस्ट टी-नटराजन याला प्लेइंग इलेव्हन दिल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे लोकेश राहुल याला अखेर डच्चू देण्यात आला आहे. मागील काही सामन्यानंतर एका गोलंदाजाची उणीव भासत होती. ही उणीव भरुन काढण्यासाठी मोठा प्रयोग करण्यात आलाय. पहिल्यांदाच रोहित शर्मासोबत कॅप्टन किंग कोहली ओपनिंग करताना पाहायला मिळणार आहे.  

आश्चर्यकारक विजयानंतर भारताची हरहुन्नरी बॉक्‍सर निखत झहीरनचा पराभव, पण..,

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पहिल्यांदा भारतीय डावाला सुरुवात केली आहे. यापूर्वी या दोघांनी एका वनडे सामन्यात ओपनिंग केली आहे. रोहित शर्मा हा प्रॉपर सलामीवर म्हणून खेळताना दिसते. दुसरीकडे आयपीएलमध्ये काही सामन्यात विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावाला सुरुवात केल्याचेही पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत विराट कोहलीने 7 टी 20 सामन्यात ओपनिंग केली आहे. यात त्याने 28. 28 ची सरासरी आणि 146.66 च्या स्ट्राईक रेटने 198 धावा केल्या आहेत. 70 ही विराट कोहलीची ओपनिंगला येऊन केलेली सर्वोच्च खेळी आहे. भारतीय संघाने मालिकेत बॅकफूटवरुन बरोबरी साधली असून हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरला आहे. 

India (Playing XI): रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार),सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, राहुल चाहर, टी नटराजन 


​ ​

संबंधित बातम्या