IND vs ENG : फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांनी शुभमनला केलं ट्रोल

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 4 March 2021

केएल राहुल आणि मयांक अग्रवाल याला त्याच्या जागी संधी द्यायला पाहिजे, असे काहीजण म्हणत आहे. काहींना तर पृथ्वी शॉचीही आठवण आली आहे.  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना निर्णय सार्थक लावता आला नाही.  इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांत आटोपला. त्यानंतर भारतीय संघाने खेळाला सुरुवात केली. शुभमन गिलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. अनुभवी अँड्रसनने गिलला खातेही उघडू दिले नाही. मालिकेत दुसऱ्यांदा त्याला खाते उघडण्यात अपयश आले. 

चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात शुभमन शुन्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला सातत्याने देण्यात येणाऱ्या संधीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल याला त्याच्या जागी संधी द्यायला पाहिजे, असे मत काहींनी व्यक्त केले आहे. तर काहींनी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत द्विशतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉचीही आठवण झाली आहे.  May be a Twitter screenshot

शुभमन गिलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दमदार कामगिरी केली होती. मात्र घरच्या मैदानावर त्याने खूपच निराशजनक खेळ दाखवला. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील 7 डावात त्याने  19.83 च्या सरासरीने 119 धावा केल्या आहेत. यात तो दोनवेळा शुन्यावर बाद झालाय. त्याच्या जागेवर आता मयांकला संधी देण्याची वेळ आली आहे, असा ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. मयंक अग्रवाल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर काही खास कामगिरी करु शकला नव्हता. परंतु घरच्या मैदानावर त्याने  99 पेक्षा अधिक सरासरीने  597 धावा केल्या आहेत. यात 3 शतकांचाही समावेश आहे. 

 


​ ​

संबंधित बातम्या