INDvsENG : ICC ची कारवाई टाळण्यासाठी आता पाटा खेळपट्टीचा उतारा?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 28 February 2021

 आयसीसीची कारवाई टाकण्यासाठी फलंदाजीस पोषक खेळपट्टी
 

अहमदाबाद : खेळपट्टीवरून दोनच दिवसांत सामना संपण्याचे महाभारत घडले, त्याच मैदानावर होणाऱ्या मालिकेतल्या अंतिम सामन्यासाठी फलंदाजीस पोषक खेळपट्टी तयार करून मोदी स्टेडियमची आयसीसीच्या प्रशासकीय समितीच्या कडक निर्बंधातून सुटका होण्याची शक्‍यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील निकालावर भारतीय संघाचे जागतिक कसोटी अंतिम सामन्यात खेळण्याचे भवितव्य अवलंबून आहे. मोदी स्टेडियमवर प्रकाशझोतात झालेला सामना जिंकून भारत या मोहिमेच्या जवळ पोहचला आहे. आता मालिकेतला अंतिम सामना अनिर्णित राहिला, तरी भारतीय संघासाठी पुरेसे ठरणार आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अंतिम सामना 4 ते 8 मार्च रोजी मोदी स्टेडियमवरच होणार आहे. या सामन्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या खेळपट्टीवरचा बाऊंस ठोस असेल, लाल चेंडूवर हा सामना होणार असल्यामुळे फलंदाजीस पोषक अशी खेळपट्टी असेल, असा अंदाज बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केला. या अंतिम सामन्यासाठीही फिरकीस पहिल्या दिवसापासून साथ देणारी खेळपट्टी बनवली, तर अजून टीका होईल आणि आयसीसीने नाराजीचा शेरा मारला, तर या मैदानाला आयपीएलसह विश्‍वकरंडक ट्‌वेन्टी-20 सामन्यांना मुकावे लागू शकेल.

INDvsENG...तर पराभूत इंग्लंडच्या संघाला दोन गुण मिळतील; भारतावर टांगती तलवार

एकाच मैदानावर दोन सामने
 

एकाच मैदानावर दोन सामने होत असतील, तर एका निकालावरून खेळपट्टीबाबत निर्णय घेता येत नाही. दुसराही सामना होऊ द्या. त्यानंतर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ कोणता अहवाल देतात, त्यावर आयसीसी कोणता निर्णय देते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. इंग्लंडने खेळपट्टीबाबत अजूनही अधिकृत तक्रार केलेली नाही, असे बीसीसीआयच्या या पदाधिकाऱ्याने सांगितले.

INDvsENG : खेळपट्टीवरुन इंग्लंडचं 'नो_रडगाणं'; टीम इंडियाचं टेन्शनच मिटलं

एकाच मैदानावर खराब आणि चांगली खेळपट्टी असली, तर आयसीसी कोणतीही कारवाई करू शकत नाही. त्यातच भारताने आता 3-1 अशी आघाडी घेऊन आपले इप्सित साध्य केले आहे. त्यामुळे आता चौथा सामना अनिर्णित राहणे जागतिक कसोटी अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरिता भारतास फायद्याचे आहे. गुलाबी रंगाच्या चेंडूवर फलंदाजी करणे सोपे नसते. हा चेंडू अधूनमधून वेगात येत असतो. इंग्लंडच्या काही माजी खेळाडूंनी त्यांच्या फलंदाजांवर टीका केली आहे. सरळ चेंडूंवर त्यांनी विकेट गमावल्या; परंतु अशा खेळपट्टया कधीकधी आपल्या संघालाच संकटातही टाकणाऱ्या ठरलेल्या आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या