INDvsENG : रोहितनं केलेल्या नेतृत्वाला तोड नाही, गेलेली मॅच जिंकून दिली (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 March 2021

17 व्या षटकात शार्दुल ठाकुरने सामन्याला कलाटणी दिली.

India vs England, 4th T20I : इंग्लंडविरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीमध्ये विजय नोंदवत टीम इंडियाने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. नाणेफेक गमावल्यानंतरही उत्तम कामगिरीच्या जोरावर जिंकता येते हे टीम इंडियाने दाखवून दिले. धावांचा पाठलाग करताना  इंग्लंडची सुरुवात खराब झाली मात्र जेसन रॉयची 27 चेंडूतील 40 धावांची खेळी आणि बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्ट्रो यांनी मोक्याच्या क्षणी केलेली 65 धावांची भागीदारी यामुळे सामना भारताच्या हातून निसटतोय असेच वाटत होते. पण 17 व्या षटकात शार्दुल ठाकुरने सामन्याला कलाटणी दिली. त्याने सेट झालेल्या आणि घातक ठरु शकेल अशा बेन स्टोक्सला सुर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. याच षटकात त्याने इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गनला बाद केले. या दोन विकेट्स टीम इंडियाच्या विजयातील टर्निंग पाँइट ठरल्या.      

आता तुम्ही म्हणाल.. यात रोहितच्या नेतृत्वाचा काय संबंध. तर झाले असे की सामन्याच्या 16 व्या षटकानंतर कर्णधार विराट कोहली हा डग आउटमध्ये बसलेला दिसला. विराट कोहली मैदानाबाहेर गेल्यानंतर उप-कर्णधार रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले. त्याने शार्दुल ठाकूरला गोलंदाजीस आणले. शेवटच्या चार षटकाचे नियोजन त्याने उत्तमरित्या केले. ज्यावेळी शार्दुल ठाकूरने बेन स्टोक्सला बाद केले त्यावेळी रोहित शर्माने व्यक्त केलेला आनंद खूप काही सांगून जाणारा होता. याउलट ज्यावेळी शेवटच्या षटकात शार्दुल ठाकूरच्या षटकात जोफ्राने दोन षटकार लगावून सामना पुन्हा रंगतदार स्थितीत आणला. यावेळी रोहित शर्मा शांतपद्धतीने शार्दुलला समजावताना दिसले. याजागी विराट असता तर काय चित्र पाहायला मिळाले असते, हे क्रिकेट पाहणाऱ्याला सांगण्याची गरज नाही. 

Image

INDvsENG: सूर्या आउट नव्हताच! विराटच्या चेहऱ्यावरही दिसला हाच भाव

भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे. मालिकेत नाणेफेक गमावल्यानंतर सामना जिंकता येतो, हे टीम इंडियाने दाखवून दिले. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

भारतीय संघाला 185 धावांत रोखेत इंग्लंडला खेळपट्टी आणि वातावरणाच्या अनुषंगाने माफेक आव्हान मिळाले होते. पण शार्दुल ठाकूरसोबत हार्दिक पांड्या, राहुल चाहर, भुवनेश्वर आणि वॉशिंग्टनने केलेल्या उत्तम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दिमाखात कमबॅक केले. विराट कोहली फिल्डवर नसताना रोहित शर्माने कमालीचे नेतृत्व केले. या दोघांच्यासंदर्भात अनेक चर्चा रंगतात. सामना संपल्यानंतर ही दोघे एकमेकांसोबत चर्चा करतानाही पाहायला मिळाले. 
 


​ ​

संबंधित बातम्या