सुर्यकुमारच्या विकेटवर दंगा; सेहवागने घेतला थर्ड अंपायरशी पंगा

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 18 March 2021

या निर्णयावर  भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे.  सेहवागने एक मिम्स शेअर करुन थर्ड अंपायरला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.

India vs England, 4th T20I: इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याना नाणेफेक गमावली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 8 बाद  185 धावा केल्या. यात सुर्यकुमार यादवने  सर्वाधिक 57 धावांचे योगदान दिले. त्याने 31 चेंडूत 3 षटकार आणि मदतीने 57 धावांची खेळी केली. सॅम कुरेनच्या गोलंदाजीवर टोलावलेल्या उत्तुंग फटक्यावर डविड मलानने घेतलेल्या झेलवर सुर्यकुमार बाद झाला. ही विकेट वादग्रस्त ठरत आहे.  मैदानी अंपायरने आउट असल्याचा सॉफ्ट सिग्नल कायम ठेवत थर्ड अंपायरने सुर्यकुमारला बाद ठरवले.  

या निर्णयावर  भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे.  सेहवागने एक मिम्स शेअर करुन थर्ड अंपायरला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. सेहवागने जो फोटो शेअर केलाय त्यात एक मुलगा डोळ्याला पट्टी बांधून उभा असल्याचे दिसते. दुसऱ्या फोटोत डेविड मलानच्या हातातील चेंडू जमीनीला स्पर्श करताना फोटो आहे.  

INDvsENG: सूर्या आउट नव्हताच! विराटच्या चेहऱ्यावरही दिसला हाच भाव

सूर्यकुमार यादवने केलेल्या (57) धावांशिवाय श्रेयस अय्यरने 18 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने  37 धावा केल्या. रिषभ पंतने 23 चेंडूत चार चौकाराच्या मदतीने 30 धावा केल्या.  लोकेश राहुल 14, रोहित शर्मा ने 12, हार्दिक पांड्या 11 तर वॉशिंगटन सुंदर ने 4 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने अवघ्या एका धावेच योगदान दिले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. बेन स्टोक्स, आदिल राशिद, मार्क वुड आणि सॅम कुरेन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 


​ ​

संबंधित बातम्या