INDvsENG : दोन कसोटी सामने पाच दिवसांत निकाली लागण्याची हीच ती वेळ!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 25 February 2021

भारतीय संघासाठी हे लक्ष्य माफकच आहे. शिवाय या धावा भारतीय संघ दुसऱ्या दिवशीच पूर्ण करुन कसोटीचा निकाल आपल्या बाजूनं लावेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील चेन्नईतील दुसरा कसोटी सामन्याचा निकाल हा तिसऱ्या दिवशी लागला. फिरकीच्या जाळ्यात अडकलेल्या इंग्लिश फलंदाजांच संकट जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरही कायम राहिले. दोन डावात मिळून इंग्लंडच्या संघाला 200 धावा करता आल्या नाहीत. पहिल्या डावात त्यांनी 112 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या 81 धावांत आटोपला. फिरकीला कसे खेळायचे हेच त्यांना कळले नाही. इंग्लंडचा दुसरा डाव 81 धावांत आटोपल्यानंतर टीम इंडियाला 49 धावांचे आव्हान मिळाले आहे. 

भारतीय संघासाठी हे लक्ष्य माफकच आहे. शिवाय या धावा भारतीय संघ दुसऱ्या दिवशीच पूर्ण करुन कसोटीचा निकाल आपल्या बाजूनं लावेल, अशी चिन्हे दिसत आहेत. जर या सामन्याचा निकाल दुसऱ्या दिवशी लागला तर दोन कसोटी सामन्यांचा निकाल पाच दिवसांत लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कसोटी सामना हा पाच दिवसांचा असतो. चेन्नईतील दुसरा कसोटी सामना तीन दिवसांत संपला. त्यानंतर खेळपट्टीवर टीकाही झाली. पण प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन ज्यो रुटने संघाला सक्षम खेळ करता आला नाही हे कबुल केल्यामुळे खेळपट्टीवरील डाग धूसर झाला.  

INDvsENG 'वेड्या'चे घर उन्हात; नरेंद्र मोदी स्टेडियमची 'अंदर की बात'

अश्विनने या सामन्यात  शतकी खेळी केली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मैदानावर हिरवे गवत दिसले होते. ज्यामुळे पिंक बॉलवर इग्लिश गोलंदाजांना ही खेळपट्टी नंदनवन ठरली असती. पण सामन्याला सुरुवात झाली त्यावेळी गवत कमी झाले आणि इंग्लिश फलंदाजांची स्पिनरला खेळण्याची कमजोरी पुन्हा समोर आली. सामन्यापूर्वी अँड्रसनने गवत कमी होईल, अशी भविष्यवाणी केली होती.

INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​

स्टोक्सने खेळपट्टीच्या नावाने रडण्यापेक्षा आपल्यातील क्षमता दाखवणे असे मोठे वक्तव्य केले. पण इंग्लिश खेळाडूंचा फिरकीचा अभ्यास कमीच पडला. श्रीलंकेला व्हाईट वॉश करुन आल्यानंतर भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकून इंग्लंडने मालिका रंगतदार होणार याचे संकेत दिले. पण फिरकीसमोर इंग्लिशच्या एकाही फलंदाजाला आत्मविश्वासाने खेळता आले नाही. पिंक बॉलवरील कसोटी सामना दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या नावे झाल्यावर आनंद निश्चित होईल. पण पाच दिवसाच्या खेळ दोन दिवसांत खल्लास होणे ही गोष्ट कसोटी खेळ आवडीनं पाहणाऱ्यांची घोर निराशा करणार असेल. 


​ ​

संबंधित बातम्या