INDvsENG: टीम इंडियाला आता सातत्याची गरज; तिसऱ्या लढतीसाठी लाल माती असलेली खेळपट्टी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 March 2021

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वेगवेगळ्या खेळपट्ट्या आपला रंग दाखवत असल्या तरी ट्‌वेन्टी-20 समन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारणाऱ्या संघाला वर्चस्वाची संधी मिळालेली आहे.

अहमदाबाद : ईशान किशनने पदार्पणात धडाकेबाज खेळी करून भारतीय संघात जणू काही नवे चैतन्यच आणले. त्यामुळे भारताने दुसरा सामना जिंकून भले मालिकेत बरोबरी साधली असली, तरी दोन्ही सामन्यांत नाणेफेकीचा कौल तितकाच निर्णायक ठरला आहे. उद्या होणाऱ्या तिसऱ्या सामन्याचेही भवितव्य नाणेफेकीवरच ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

 Video: बुमराह-संजनाच्या शानदार लग्नसोहळ्याची छोटीशी झलक

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वेगवेगळ्या खेळपट्ट्या आपला रंग दाखवत असल्या तरी ट्‌वेन्टी-20 समन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारणाऱ्या संघाला वर्चस्वाची संधी मिळालेली आहे. रविवारी झालेला दुसरा सामना जिंकून भारतीयांनी आत्मविश्‍वासाबरोबर लयही मिळवली आहे, परंतु उद्याच्या सामन्यात नाणेफेक आपल्या बाजूने झाली नाही तरी भारतीय संघाचा दृष्टिकोन सकारात्मक असेल यात शंका नाही.
पहिल्या सामन्यातील एकतर्फी परभवानंतर भारताने संघात तीन बदल केले, त्यात ईशान किशनच्या तडाखेबंद खेळीने नवी दिशा मिळाली आहे. उद्याच्या तिसऱ्या सामन्यात आणखी बदल केले जातात की हाच संघ कायम ठेवला जातो हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

लक्ष्य इंग्लंड

तिसरी ट्‌वेंटी 20
ठिकाण : नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा अहमदाबाद
थेट प्रक्षेपण : संध्याकाळी 7 पासून स्टार स्पोर्टस्‌
मालिकेतील स्थिती : 1-1 बरोबरी
खेळपट्टीचा अंदाज : लढतीसाठी लाल माती असलेली खेळपट्टी. तिला तडे पडलेले नाहीत, पण तरीही फिरकीला जास्त साथ देण्याची शक्‍यता.
हवामानाचा अंदाज : सामना प्रामुख्याने 30 अंश तपमानात. एका तासाच्या खेळानंतर वाऱ्याचा वेग वाढणार. तसेच उत्तरार्धात दव माफक सतावण्याची शक्‍यता.
 


​ ​

संबंधित बातम्या