INDvsENG : वनडे दरम्यान पुण्याच्या टेकडीवर रंगला होता सट्टेबाजीचा खेळ

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 27 March 2021

स्टेडियमजवळील टेकडीवर सुरु असलेल्या प्रकाराची खबर मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी  तातडीने कारवाई केली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुण्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेत सट्टेबाजीचा प्रकार उघडकीस आलाय. पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दुसऱ्या वनडेच्या दिवशी 33 बुकींना अटक केली असून त्यांच्याकडून 44 लाखांची रोकड जप्त केल्याचे वृत्त समोर आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानात दुसरा वनडे सामना सुरु असताना जवळच्या टेकडीवरुन दुर्बिन आणि उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सामना पाहत सट्टेबाजीचा खेळ सुरु होता. 

INDvsENG : थर्ड अंपायरने स्टोक्सला दिले नॉट आउट, कोहली झाला नाराज​

स्टेडियमजवळील टेकडीवर सुरु असलेल्या प्रकाराची खबर मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने कारवाई केली. वेगवेगळ्या तीन टेकडीवरुन 33 जणांना अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवडचे पोलिस अधिक्षक कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे यात हरियाणातील सर्वाधिक 13 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 11, मध्य प्रदेशमधील 5, राजस्थानचे 2 आणि गोवा आणि उत्तर प्रदेशमधील एकाचा समावेश आहे.  

INDvsENG : सक्सेसफुल DRS वर पंतला बाउंड्री का मिळाली नाही?

पोलिसांनी छोपेमारी करुन  45 लाख रुपयांची रोकड,  74 मोबाईल फोन, तीन लॅपटॉप, एक टॅबलेट, आठ एचडी कॅमेरा, दुर्बिन आणि परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. कारवाईसाठी आलेल्या पोलिस पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्नही आरोपींनी केला. पण पोलिसांच्या खाक्यासमोर आरोपींचे इरादे गळून पडले.  

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील मैदानात सुरु असलेल्या सामन्यांसाठी प्रेक्षकांना एन्ट्री न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानंतर काही क्रिकेट प्रेमींनी चक्क घोरडेश्वर टेकडीवर जाऊन मॅच पाहण्याचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले होते. या प्रकाराची चर्चाही रंगली. सचिन तेंडुलकरचा जबऱ्या फॅन सुधीरनेही या टेकडीवरुन सामन्याचा आनंद घेत क्रिकेट प्रेम दाखवून दिले होते. त्यानंतर आता या ठिकाणी सट्टेबाजीची भांडाफोड झाली आहे.   


​ ​

संबंधित बातम्या