Ind vs En 2nd Test : अश्विनचा पंजा; 134 धावांतच इंग्लंडचा खेळ खल्लास!

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 14 February 2021

इंग्लंडच्या केवळ तीनच खेळाडूंनी दुहेरी अंकी धावसंख्या उभारली

India vs England 2nd Test Day 2 :  चेन्नईच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांत आटोपला. भारतीय संघाला 198 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय संघाकडून अश्विनने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने दिमाखदार कमबॅक करण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय संघाने चेन्नईच्या मैदानात नाणेफेक जिंकून सर्व प्रथम फलंदाजी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आघाडी कोलमडल्यानंतही रोहित-अजिंक्य आणि पंत या त्रिकूटाच्या जोरावर टीमने पहिल्या दिवशी 300 धावा केल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी पंतला तळाच्या फलंदाजीतून कुणाचीही साथ मिळाली नाही. परिणामी भारतीय संघाचा डाव दुसऱ्या दिवशी केवळ 29 धावांची भर घालू शकला. पण या धावा पुरेशा आहेत, असाच काहीसा संकेत फिरकीपटुंनी दिला. ईशांत शर्माने सुरुवातीला दिलेल्या धक्यानंतर अश्विन-अक्षरने इंग्लिश फलंदाजांना अक्षरश: नाचवले.

INDvsENG : वाजवा रे, शिट्या, टाळ्या वाजवा; विराटचा मैदानावरूनच प्रेक्षकांशी संवाद! (VIDEO)

विकेट किपर फलंदाज बेन फोक्स 42 (107)* धावांची खेळी वगळता अन्य कोणालाही मैदानात फार काळ तग धरता आला नाही. त्याच्याशिवाय ओली पोप 22 (57), बेन स्टोक्स 18 (34) आणि सिब्ले 16 (25) यांच्याशिवाय कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. त्यामुळे पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 134 धावांतच आटोपला. भारताकडून अश्विनने 5, अक्षर पटेलनं  आणि ईशांत शर्मा 2 तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. कुलदीप यादवचा विराटने फार वेळ वापरले नाही. त्यामुळे त्याला विकेट घेण्यात यश आले नाही.

 


​ ​

संबंधित बातम्या