INDvsENG : पहिल्याच चेंडूवर अश्विनने इंग्लिश सलामीवीराला दाखवला तंबूचा रस्ता

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 8 February 2021

 अश्विनने  पाहुण्यांना पहिला धक्का देत इंग्लिश खेळाडूंना नाचवण्याचे संकेत दिले आहेत.

India vs England 1st Test :  भारतीय संघाचा पहिला डाव 337 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावाला सुरुवात केली. सलामीवीर रॉरी बर्न्सला पहिल्याच चेंडूवर बाद करत अश्विनने पाहुण्या इंग्लंडला पहिला धक्का दिला. इंग्लंडने पहिल्या डावात 241 धावांची आघाडी घेतली असून फिरकीपटू या सामन्याचा निकाल लावणार, याचे संकेत अश्विनने दिले आहेत. 

पहिल्या डावात भारतीय संघातील एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नाही. पुजारा आणि पंत यांच्या अर्धशतकानंतर वॉशिंग्टनच्या भात्यातून अर्धशतक निघाले. अश्विनने त्याला उत्तम साथ दिली. 91 चेंडूत अश्विनने 33 धावांची खेळी करत फलंदाजीतील क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली होती. खेळपट्टी फिरकीला साथ देण्याची चिन्हे लीचच्या गोलंदाजीनंतर मिळाली. त्यात आता अश्विनने इंग्लंडला पहिला धक्का देत इंग्लिश खेळाडूंना नाचवण्याचे संकेत दिले आहेत.   


​ ​

संबंधित बातम्या