India vs England 1st Test : अश्विन बुमराहनं इंग्लंडच टेन्शन वाढवलं

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 5 February 2021

अनुभवी फिरकीपटूने बर्न्सला माघारी धाडत सलामीची जोडी फोडून टीम इंडियाला दिलासा दिला. 

चेन्नईच्या मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर रॉरी बर्न्स (Rory Burns) आणि डॉमिनिक सिब्ले Dominic Sibley जोडीनं पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतेय, असे वाटत असताना अनुभवी फिरकीपटूने बर्न्सला माघारी धाडत सलामीची जोडी फोडून टीम इंडियाला दिलासा दिला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या डॅनियल लॉरेन्सला बुमराहने खातेही उघडू दिले नाही. 

सलामीवीर रॉरी बर्न्सने 60 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. अश्विनच्या फिरकीतील झलक ही यजमान इंग्लंडचे टेन्शन वाढवणारे आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत इंग्लंड कर्णधार ज्यो रुटने आशियातील सर्वोच्च खेळी साकारली होती. भारतीय मैदानात तो कशी कामगिरी करतोय यावर इंग्लंडची पुढची गणित अवलंबून असणार आहेत.

INDvsENG : टीम इंडियाच्या मिटींगमध्ये झाली शेतकरी आंदोलनाची चर्चा
Image

जसप्रित बुमराह आणि अश्विनशिवाय भारतीय गोलंदाजीची मदार ईशांत शर्मा, शहाबाज नदीम आणि  वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर असणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या