INDvsENG 1st Test Day 2: दुसरा दिवसही पाहुण्यांचा; इंग्लंड 8 बाद 555 धावा

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 February 2021

3 बाद 263 धावांवरुन इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या डावाला सुरुवात केली.

India vs England 1st Test  : कर्णधार ज्यो रुटच्या 218 धावा त्याला बने स्टोक्सनं दिलेली उत्तम साथीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेर 8 बाद 555 धावांपर्यंत मजल मारली. 3 बाद 263 धावांवरुन इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या डावाला सुरुवात केली. जो रुटची साथ देण्यासाठी बेन स्टोक्स मैदानात उतरला.  बेन स्टोक्सने अर्धशतकाला गवसणी घातली. अखेर नदीमच्या फिरकीने ज्यो रुट आणि बेन स्टोक्स जोडी फोडण्यात यश मिळाले.

बेन स्टोक्स पुजाराच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. त्याने 118 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 82 धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. बेन स्टोक्स तंबूत परतण्यापूर्वी इंग्लंडच्या संघाने 400 + धावा केल्या होत्या. चेन्नईच्या मैदानात कसोटी कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकवणाऱ्या ज्यो रुटच्या रुपात नदीमने भारताला पाचवे यश मिळवून दिले. ज्यो रुटने 377 चेंडूत 19 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 218 धावांची खेळी केली. 

रूटची भारतातील पाळेमुळे; चेन्नईच्या मैदानात खास विक्रमाला गवसणी

तळाच्या फलंदाजीत ओली पोप 34 (89), जोस बटलर 30(51) धावा करुन बाद झाले. भारताकडून नदीम आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. तर अश्विनला एक बळी मिळवण्यात यश आले. कर्णधाराला साजेसा खेळ केलेल्या रुटमुळे इंग्लंडचा संघ सध्याच्या घडीला मजबूत स्थितीत आहे.   


​ ​

संबंधित बातम्या