INDvsENG 1st Test : टीम इंडियाचा 'विराट' पराभव

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 9 February 2021

दिवसभरात 9 विकेट गमावणार नाही याचे आव्हान टीम इंडियाला पेलावे लागणार आहे. 

INDvsENG 1st Test Update : चेन्नईच्या मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत दिसत आहे. अनुभवी अँड्रसनने सेट झालेल्या शुभमन आणि अजिंक्य रहाणेच्या रुपात मोठे बळी मिळवत टीम इंडियाला संकटात आणले आहे. डॉम बेस आणि लीचच्या चेंडूही कमालीचे वळत असून सामना वाचवणे टीम इंडियासाठी जवळपास मुश्कीलच दिसते. 

अखेरच्या दिवशी  1 बाद 39  धावांवरुन टीम इंडियाने खेळायला सुरुवात केली.  अखेरच्या दिवशी चेंडू कमी-जास्त प्रमाणात उसळी घेऊ शकतो.  त्यामुळे  धावा करणे सोपे. दिवसभरात 9 विकेट गमावणार नाही याचे आव्हान टीम इंडियाला पेलावे लागणार आहे. 

अपडेट्स

#179-8 बेन स्टोक्सनं कोहलीचा खेळ केला खल्लास, कोहलीने 105 चेंडूत 72 धावा केल्या 

#171-7  46 चेंडूत 9 धावा करुन अश्विन माघारी, लीचला मिळाले यश

Image

#कर्णधार विराट कोहलीनं 84 चेंडूत साजरे केले अर्धशतक

Image

#117-6 डॉम बेसनं वॉशिंग्टन सुंदरला खातेही उघडू दिले नाही. 

Image

#110-5 रिषभ पंतला अँड्रसनने धाडले माघारी, त्याने 19 चेंडूत 15 धावा केल्या

Image

#92-4 अँडसनने कमालीच्या इनस्विंगवर अजिंक्य रहाणेला दाखवला तंबूचा रस्ता, त्याला खातेही उघडता आले नाही

Image

#92-3अँड्रसननं घेतली शुभमनची विकेट, 83 चेंडूत 50 धावा करुन फिरला माघारी

#शुभमन गिलच दमदार अर्धशतक,  81 चेंडूत त्याने 7 चौकार आणि एका षटकार खेचला 

#58-2 पुजाराच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का; लीचला मिळालं यश पुजारानं 38 चेंडूत 15 धावा केल्या

Image


​ ​

संबंधित बातम्या