रूटची भारतातील पाळेमुळे; चेन्नईच्या मैदानात खास विक्रमाला गवसणी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 February 2021

विशेष म्हणजे लॅंडमार्क ठरणाऱ्या या कसोटीत त्याने किमान अर्धशतक केले आहे.

India vs England 1st Test : ज्यो रूट इंग्लंडचा खेळाडू असला, तरी त्याची पाळेमुळे भारतात घट्ट रोवलेली आहेत. 2012 मध्ये नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळलेल्या रूटने 50 वा कसोटी सामना विखाशापट्टणम येथे खेळला आणि 100 वा सामना चेन्नईत खेळताना शानदार शतक झळकावून आपल्या वर्चस्वाची मोहोर उमटवली. 

पंतने गडबडीत कॅच सोडला; पण यष्टीमागच्या बडबडीत कमी पडला नाही; व्हिडिओ व्हायरल

विशेष म्हणजे लॅंडमार्क ठरणाऱ्या या कसोटीत त्याने किमान अर्धशतक केले आहे. भारतात येण्याअगोदर गेल्या महिन्यातील श्रीलंका दौऱ्यात रूटने द्विशतक आणि दीड शतक केले होते. आता 98, 99 आणि 100 वी कसोटी अशा सलग तीन कसोटीत शतक करणारा तो क्रिकेटविश्‍वातील पहिला फलंदाज ठरला.

दुसऱ्या दिवशी 128 धावांवरुन पुढे खेळणाऱ्या ज्यो रुटने दिडशे धावा पूर्ण केल्या असून बेन स्टोक्सच्या साथीनं तो इंग्लंड संघाचा डाव आणखी मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. दोघांनी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या