INDvsENG : अश्विनचा सिक्सर; मॅग्रा, हेडली आणि 'स्टेनगन'ला टाकले मागे

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 8 February 2021

पहिल्या डावात अश्विनने दोन विकेट घेतल्या होत्या. 

India vs England 1st Test :  पहिल्या डावात 578 धावा करणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 178 धावांत आटोपला आहे. अश्विनच्या फिरकीसमोर पाहुण्या संघाने नांगी टाकली. भारतीय संघाला विजयासाठी आता 420 धावांचे लक्ष्य मिळाले असून सामन्याचा निकाल काय लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

Australian Open 2021 : सेरेनाचा हटके अंदाज; चर्चा तर होणारच (VIDEO)

इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पहिल्या चेंडूवर बर्न्सला तंबूत धाडत अश्विनने साहबांच्या ताफ्याला दमवण्याचे संकेत दिले. पहिल्या डावात 87 धावा करणाऱ्या सिब्लेचीही त्यानेच विकेट घेतली. बेन स्टोक्स (7), डॉम बेस (25), जोफ्रा आर्चर (5) आणि अँड्रसन यांची विकेट घेत त्याने दुसऱ्या डावात सहा गड्यांना तंबूत धाडले. पहिल्या डावात अश्विनने दोन विकेट घेतल्या होत्या. 

INDvsENG : वॉशिंग्टचं शतक हुकलं; पण 'सुंदर' षटकारानं जिंकलं (VIDEO)

अश्विनने आतापर्यंत 28 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याया पराक्रम केला आहे. इंग्लंड विरुद्ध अशी कामगिरी त्याने चौथ्यांदा केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 300 पेक्षा अधिक विकेट घेणाऱ्या मोजक्या गोलंदाजांमध्ये अश्विनचा समावेश होतो. कामगिरीतील या सातत्याच्या जोरावर इंग्लंड दौऱ्यावरच तो कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट घेण्याचा टप्पा पार करेल. 

75 कसोटी सामन्यात अश्विनच्या खात्यात आता 386 विकेट जमा झाल्या आहेत. डेल स्टेनने 75 कसोटी सामन्यात  383 विकेट घेतल्या होत्या. हेडली यांनी  375 तर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज  मॅग्राने  75 कसोटी सामन्यात 358 विकेट घेतल्या होत्या. या दिग्गजांपेक्षा अश्विनची कामगिरी सरस ठरली आहे. 

भारतीय संघाच्या पहिल्या डावात अश्विनने फलंदाजीची क्षमताही पुन्हा एकाद दाखवून दिली होती. त्याने वॉशिंग्टनच्या साथीनं तब्बल 30 षटके मैदानात उभार राहिला. 180 चेंडूत या दोघांनी 80 धावांची भागीदारी केली. यात अश्विनने 91 चेंडू खेळत 33 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात वेळप्रसंगी भारतीय संघाला तारण्याचे काम तो बॅटिंगच्या मदतीनेही करु शकतो.  


​ ​

संबंधित बातम्या