INDvsENG 1st Test : चेन्नईचं मैदान मारत इंग्लंडने दिले 'लगान' वसूल करण्याचे संकेत

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 9 February 2021

चौथ्या दिवशी अवघ्या 178 धावांत आपला दुसरा डाव आटोपलेल्या इंग्लंड संघाने टीम इंडियासमोर 420 धावांचे आव्हान ठेवले होते.

पाहुण्या इंग्लंडच्या संघाने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे. चौथ्या दिवशी अवघ्या 178 धावांत आपला दुसरा डाव आटोपलेल्या इंग्लंड संघाने टीम इंडियासमोर 420 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा दुसरा डाव 187 धावांत आटोपला. सलामीवीर शुभमन गिलच्या 50 धावा आणि विराट कोहलीच्या 75 धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. इंग्लंडने पहिला सामना 232 धावांनी जिंकला आहे.  दुसऱ्या डावात जॅक लीचने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जेम्स अँड्रसन 3 आणि डॉम बेस आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बेन स्टोक्सने विराट कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. 

धावफलकावर अवघ्या 58 धावा असताना भरवशाचा फलंदाज पुजारा बाद झाला. त्याला लीचने माघारी धाडले. त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. शुभमन गिलच्या साथीनं त्याने संघाचा डावा सावरण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला शुभमन गिलने अर्धशतकी खेळी पूर्ण केली. पण अँड्रसनने ही जोडी फोडत संघाला मोठं यश मिळवून दिले. तो 50 धावा करुन माघारी फिरला. याच षटकात अँड्रसनने उप कर्णधार अजिंक्य रहाणेची विकेट घेतली. हा सामन्याचा टर्निंग पाइंट ठरला. अजिंक्य रहाणेला खातेही उघडता आले नाही. विराट कोहलीच्या 72 धावा वगळता अन्य कोणत्या फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. अश्विने 46 चेंडूचा सामना करत सिडनी कसोटीची आठवण करुन दिली मात्र 9 धावांवर त्याला जॅक लिचने बाद केले. 

पहिल्या डावात डॉम बेसने भारतीय संघाच्या चार फलंदाजांना बाद केले होते. तर आर्चरने सलामी जोडी माघारी धाडली होती. दुसऱ्या डावात  थोडे उलटे पण इंग्लंडच्या फायद्याचे चित्र पाहायला मिळाले. फिरकीपटू जॅक लिचने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याला अँड्रसनने आणि इतर गोलंदाजांनी मदत केली. 

 

 


​ ​

संबंधित बातम्या