INDvsENG : ‘ब्रिस्बेन’ची पुनरावृत्ती आज चैन्नईत?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

विजयापेक्षा पराभव टाळण्याचेच भारतासमोर मोठे आव्हान

चेन्नई : इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना निर्णायक क्षणावर आला आहे. ज्या भारतीय संघाने गेल्याच महिन्यात ब्रिस्बेनमधील कसोटीत कमाल केली, तसाच पराक्रम करण्याची आशा आहे; परंतु विजयापेक्षा पराभवाचेच संकट मोठे आहे. 420 धावांच्या आव्हानासमोर 1 बाद 39 अशी सुरुवात केली असली, तरी उद्या अखेरच्या दिवशी चेंडू कमी-जास्त प्रमाणात उडणाऱ्या आणि मधूनच वळणाऱ्या खेळपट्टीवर 381 धावा करणे सोपे नाही. 90 षटकांत नऊ विकेट बाद न होऊ देणे हेच फाच मोठे आव्हान असणार आहे.

ब्रिस्बेन कसोटीत भारताने अखेरच्या दिवशी 324 धावांचे लक्ष पार केले; पण चेन्नईतील खेळपट्टी बेभरवशाची झाली आहे. आजच्या चौथ्या दिवशी दोन्ही संघांचे मिळून 15 फलंदाज बाद झाले आणि इंग्लंडचा संघ दडपणाखाली नसतानाही संपूर्ण दिवसांत 297 धावा झाल्या. ही आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. 

 INDvsENG : अश्विनचा सिक्सर; मॅग्रा, हेडली आणि 'स्टेनगन'ला टाकले मागे

अश्‍विनच्या सहा विकेट

खेळपट्टी तिसऱ्या दिवसापासून फिरकीस अनुकूल होऊ लागली आहे. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाल्यावर कोहलीने नवा चेंडू अश्‍विनच्या हाती दिला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर बर्न्सला बाद केले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो भारताचा पहिला फिरकी गोलदाज ठरला. त्याने 61 धावांत सहा विकेट मिळवल्या. यावरून या खेळपट्टीवर पाचव्या दिवशी फलंदाजी करणे किती अवघड आहे, याचे संकेत मिळाले. 

नदिमकडून निराशा

अश्‍विनची गोलंदाजी खेळणे एका बाजूने इंग्लिश फलंदाजांना कठीण होते; पण दुसऱ्या बाजूने नदिमने मात्र पुन्हा एकदा निराशा केली. भारताला फॉलोऑन न देता 241 धावांच्या आघाडीने डाव सुरू करणाऱ्या इंग्लंडकडून आक्रमक फलंदाजी होणे अपेक्षित होते. केवळ टप्प्यावर गोलंदाजी पुरेशी होती; परंतु नदिमने 4.40 च्या सरासरीने धावा दिल्या. कोहलीने 20 षटकांनंतर हुकमी बुमराला गोलंदाजी दिली; तर 45 व्या षटकांनंतर सुंदरच्या हाती चेंडू ठेवला. 

ICC Awards : इंग्लिश क्रिकेटरला मागे टाकत पंतच्या शिरेपेचात मानाचा तुरा

पुन्हा स्वीप-रिव्हर्स स्वीप

भारतीय फिरकीला नामोहम करण्यासाठी प्रामुख्याने रूटकडून आज 32 चेंडूंतील 40 धावांच्या खेळीत पुन्हा स्वीप-रिव्हर्स स्वीपचा मुक्तपणे वापर करण्यात आला. क्षेत्ररक्षक कोठे उभा करायचा, असा प्रश्‍न कोहलीसमोर वारंवार पडत होता.

IND vs ENG: त्रिशतकासह ईशांत कपिल पाजी आणि झहीरच्या पंक्तीत

ईशांतच्या ३०० विकेट
लॉरेन्सला बाद करून ईशांत शर्माने कसोटी क्रिकेटमधील विकेटचे त्रिशतक पूर्ण केले. भारतीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. 

INDvsENG : वॉशिंग्टचं शतक हुकलं; पण 'सुंदर' षटकारानं जिंकलं (VIDEO)

सुंदर पुन्हा लढला
ब्रिस्बेन कसोटीत आपल्या फलंदाजीची क्षमता दाखवणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता दाखवली. तिसऱ्या दिवशी पंतसह डाव सावणाऱ्या सुंदरने आज नाबाद 85 धावा केल्या. 
 


​ ​

संबंधित बातम्या