Ind vs Eng 1st Test Day 4 : भारतीय संघाला विजयासाठी 381 धावांची गरज

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 8 February 2021

अश्विन त्याला सुरेख साथ देताना दिसत आहे.

India vs England  1st Test Day 4  :  इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या 420  धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा दुसऱ्या डावातही फेल ठरला. पहिल्या डावात जोफ्राचा शिकार झाल्यानंतर यावेळी त्याला लीचने आपल्या फिरकीत अडकवले. अप्रतिमरित्या चकवा देत लीचने रोहितची दांडी गुल केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाच्या धावफलकावर 1 बाद 39 धावा होत्या. पुजारा आणि शुभमन मैदानात होते.  

भारतीय संघाचा पहिला डाव आटोपल्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर अश्विनने सलामीवीर रॉरी बर्न्सला तंबूत धाडले. सिब्ले आणि लॉरेन्सने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनने त्यांचा डाव उधळून लावला. पहिल्या डावात भारतीय संघाला दमवणाऱ्या सिब्लेला अश्विनने  16 धावांवर माघारी धाडत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. धावफलकावर अवघ्या 32 धावा असताना तो बाद झाला. एका अप्रतिम चेंडूवर ईशांत शर्माने लॉरेन्सला पायचित करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. या विकेटसह त्याने कसोटीत 300 धावांचा पल्ला गाठला.

INDvsENG: अजिंक्यला फेल ठरवणारा रुटचा अप्रतिम झेल पाहिलात का?

बेन स्टोक्सच्या रुपात अश्विनने संघाला चौथे यश मिळवून दिले. त्यानंतर पहिल्या द्विशतकवीराला बुमराहने पायचित केले. त्याने 40 धावांची भर घातली. ओली पोप (28) आणि जोस बटलर (24) यांना नदीमने बाद केले. नदीमच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या बटलर बाद झाला. अश्विनने भारताकडून सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. दोन्ही डावात मिळून त्याने 8 गडी टिपले.  

तत्पूर्वी भारतीय संघाचा पहिला डाव 337 धावांत आटोपला असून पाहुण्या इंग्लंडने 241 धावांची आघाडी घेतली. वॉशिंग्टन सुंदरने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकवण्याचे संकेत दिले. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. तो 85 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून जोफ्रा आर्चर, लीच आणि अँड्रसन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. डॉम बेसला सर्वाधिक चार बळी मिळवण्यात यश आले.

INDvsENG : पंत पुन्हा ठरला कमनशिबी; नर्व्हस नाइंटीचा चौकार!

चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अष्टपैलू वॉशिंग्टनने अर्धशतक पूर्ण करत टीम इंडियाला दिलासा दिला. अश्विन त्याला सुरेख साथ देताना दिसला. भारतीय संघाने 6 बाद 257 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. या जोडीने टीम इंडियाची धावसंख्या 300 पार नेली.   

अश्विनकडून सिडनीत ज्याप्रमाणे खेळ केला त्याच तोऱ्यात खेळताना दिसला. 91 चेंडूंचा सामना करताना त्याने 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. तिसरा दिवस बेसने गाजवल्यानंतर चौथ्या दिवशी लीचने आपल्या फिरकीने अश्विनला चकवा दिला. जॅक लीचने शहाबाज नदीमला खातेही उघडू दिले नाही. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ईशांत शर्माला अँडसनने बाद केले. जसप्रीत बुमराहला शून्यावर माघारी धाडत इंग्लंडने भारतीय संघाला 337 धावांत रोखले.


​ ​

संबंधित बातम्या