India vs England, 1st T20I : कोहलीचा भोपळा; रोहितला बसवणं महागात पडणार?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 March 2021

भारतीय संघात सलामीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे असे प्रयोग होणे स्वाभाविक असले तरी मॅचपूर्वी विराट कोहलीने दिलेले स्पष्टीकरण आणि नाणेफेक झाल्यानंतर निवडलेला संघ यातील तफावत  पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारा आहे.  

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापासून भारतीय संघाने प्रयोगाचे खेळ सुरु केले आहेत. आगामी वर्ल्ड कपसाठी महत्त्वपूर्ण मानली जात असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफक गमावली. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी केएल राहुल आणि रोहित शर्मा भारतीय डावाची सुरुवात करतील, विराट कोहलीने स्पष्ट केले होते. रोहितला विश्रांती देऊन धवनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिल्याचे पाहायला मिळाले.

जोफ्रा आर्चरने वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. आदिल राशिदच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. रोहितला खाली बसवण्याचा भारतीय संघाने अचानकपणे घेतलेल्या निर्णय हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे. हा निर्णय टीम इंडियाला महागात पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

भारतीय संघात सलामीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे असे प्रयोग होणे स्वाभाविक असले तरी मॅचपूर्वी विराट कोहलीने दिलेले स्पष्टीकरण आणि नाणेफेक झाल्यानंतर निवडलेला संघ यातील तफावत  पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारा आहे.  

​ ​

संबंधित बातम्या