INDvsENG T20 : सलामीला अनेक पर्याय, पण चौथ्या क्रमांकाबाबत निर्णय नाही

सुनंदन लेले, सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 March 2021

ऑस्ट्रेलियातील ट्‌वेंटी 20 मालिकेच्यावेळी रोहित शर्मा अनफिट होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी रोहितच्या साथीला केएल राहुल याची निवड करावी आणि शिखर धवनला राखीव ठेवण्याची सूचना अनेक माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. पण स्वतः सलामीला खेळणार असल्यामुळे रोहितने याबाबत भाष्य टाळले आहे. 

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धची ट्‌वेंटी 20 मालिकेसाठी भारतीय संघासमोर रोहीत शर्मा, शिखर धवन, के एल राहुल पर्याय आहेत, त्यामुळे सलामीला नेमके कोण खेळणार याचे औत्सुक्य क्रिकेट रसिकात आहे. मात्र याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे रोहीत शर्माने सांगितले. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याबाबतही काहीही सांगण्यास रोहीतने नकार दिला. 

ऑस्ट्रेलियातील ट्‌वेंटी 20 मालिकेच्यावेळी रोहित शर्मा अनफिट होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी रोहितच्या साथीला केएल राहुल याची निवड करावी आणि शिखर धवनला राखीव ठेवण्याची सूचना अनेक माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. पण स्वतः सलामीला खेळणार असल्यामुळे रोहितने याबाबत भाष्य टाळले आहे. 

Vijay Hazare Trophy 2021 : कॅचेस विन मॅचेसचा विसर; दोघांमधील गोंधळाचा फलंदाजाला झाला फायदा 
 

सलामीला कोण खेळणार याबाबत निर्णय झालेला नाही. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाबाबतही निर्णय झालेला नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात इंग्लंड चांगला प्रतिस्पर्धी आहे. ही मालिका जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय संघात असताना सामने जिंकण्याकडेच लक्ष असते. वर्तमान चांगले असेल तर भविष्यही चांगले होते, असे त्याने सांगितले.

इंग्लंडविरुद्धची मालिका ही विश्‍वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेची पूर्वतयारी आहे. ही स्पर्धा खूप वर्षांनंतर होत आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी मी खूपच आतुर आहे. यंदा ही स्पर्धा भारतात आहे. मात्र दरवर्षी विश्‍वकरंडक स्पर्धा नको, असे रोहितने स्पष्ट केले. नव्याने संघात आलेल्या सूर्यकुमार यादव, इशान किशन यांनी कोणतेही दडपण घेऊ नये. भरपूर मेहनत करा आणि बिनधास्त खेळा, असा सल्ला रोहितने त्यांना दिला. भारतीय संघातील वातावरण मस्त आहे. भारतीय संघातून खेळणार म्हटल्यावर थोडेफार दडपण येणारच, पण सतत कामगिरीचा विचार करू नका, असेही त्याने सांगितले. 

Vijay Hazare Trophy 2021 : पृथ्वी एकटा भारी पडतोय, सेमीफायनलमध्ये शतकी शो!

अधिकाधिक चेंडू खेळण्याचे लक्ष्य 

ऑस्ट्रेलिया आणि भारतात कसोटी खेळताना माझ्या शैलीला मुरड घालून खेळायचे आव्हान होते. फलंदाज म्हणून हे आव्हान पेलले, तो मी मनावर मिळवलेला विजय मानतो. शेवटच्या कसोटीत 49 धावा करताना दीडशे चेंडू खेळलो. फटके मारण्यास मुरड घातली. एका अर्थाने ती छोटी लढाई जिंकलो म्हणून मोठी खुशी मिळाली. आता यापुढे कसोटीत जास्तीत जास्त चेंडू खेळणे हे ध्येय असेल. जर दीडशे चेंडू खेळलो तर धावा होतील. या बदलाचा मला फलंदाज म्हणून फायदा होईल. मनावर ताबा येत असल्याने आत्मविश्‍वास वाढेल, असे रोहितने सांगितले.

रिषभवर दडपण नको
 

रिषभ पंतकडून फार वेगळ्या अपेक्षा नाहीत. तो भन्नाट खेळतोय. त्याने त्याच्या शैलीतच खेळावे. तो खेळाचा भरपूर आनंद घेत आहे. माध्यमांनी त्याच्यावर दडपण आणू नये, असे रोहितने सांगितले. त्याचवेळी त्याचे यष्टीरक्षण सुधारल्याने आम्ही त्याला मनमोकळी फलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, असेही रोहित म्हणाला. हार्दिक पंड्या खेळायला सज्ज आहे. फलंदाजी तसेच गोलंदाजीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, मेहनत घेत आहे, असेही रोहितने सांगितले. 

इंग्लंडविरुद्धची मालिका विश्‍वकरंडक ट्‌वेंटी 20 ची चाचणी
 

इंग्लंडविरुद्धच्या ट्‌वेंटी 20 मालिकेतून विश्‍वकरंडक स्पर्धेच्यावेळी संघात कोण असेल याची पूर्णपणे कल्पना आम्हाला आली असेल, असे भारतीय संघाचे फलंदाज मार्गदर्शक विक्रम राठोड यांनी सांगितले. इंग्लंडविरुद्धची ट्‌वेंटी 20 मालिका शुक्रवारी सुरू होईल, तर विश्‍वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा ऑक्‍टोबर नोव्हेंबरमध्ये भारतात आहे. राठोड यांनी व्यक्त केलेले मत
    

विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी सर्व फलंदाज स्थिरावण्याची गरज
   

  • संघातील फलंदाज बऱ्यापैकी निश्‍चित असल्यामुळे त्यात फारसे बदल अपेक्षित नाहीत. एखाद्याचा सूर हरवल्यास अथवा दुखापत झाल्यास त्याचे पर्याय महत्त्वाचे
  •  स्ट्राईक रेटपेक्षा खेळीचा विजयासाठी किती उपयोग हे महत्त्वाचे
  •   समाधानकारक धावा होत आहेत, लक्ष्य साध्य होत आहे, तोपर्यंत मी वैयक्तिक स्ट्राईक रेटला जास्त महत्त्व नाही.

​ ​

संबंधित बातम्या