IND vs ENG, 1st ODI: पुण्याच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगोयोग!

सकाळ स्पोर्ट्स टीम
Tuesday, 23 March 2021

 रतीय संघात क्रुणाल पांड्याने वनडेत पदार्पण केले. त्याच्यासोबत हार्दिक पांड्यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. इंग्लंडच्या संघाकडूनही भाऊ-भाऊ खेळताना दिसले. टॉम कुरेन आणि सॅम कुरेन ही जोड प्रतिस्पर्धी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसली.

India vs England, 1st ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात कमालीचा योगायोग जुळून आला. क्रिकेटच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच दोन्ही संघात भाऊ-भाऊ खेळताना दिसले. भारतीय संघात क्रुणाल पांड्याने वनडेत पदार्पण केले. त्याच्यासोबत हार्दिक पांड्यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. इंग्लंडच्या संघाकडूनही भाऊ-भाऊ खेळताना दिसले. टॉम कुरेन आणि सॅम कुरेन ही जोड प्रतिस्पर्धी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसली.  

क्रुणाल आणि हार्दिक ही भारतीय संघातील तिसरी भावा-भावांची जोडी आहे जी वनडेत एकत्रित खेळताना पाहायला मिळाले. यापूर्वी मोहिंदर आणि सुरिंद्र अमरनाथ आणि इरफान पठाण आणि युसूफ पठाण या जोडीला क्रिकेट चाहत्यांनी एकत्रित खेळताना पाहिले होते.  अमरनाथ बंधु टीम इंडियासाठी तीन वनडे सामन्यात एकत्रित दिसले आहेत. पठाण बंधुंनी सर्वाधिक आठ वनडेत एकत्रपणे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. 

INDvsENG गब्बर नवव्यांदा झाला नर्व्हस नाइंटीचा शिकार

ऑक्टोबर 2018 मध्ये टॉम आणि सॅम बंधू  श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एकत्र खेळले होते. विशेष म्हणजे दोन्ही संघातील भावा-भावांची जोडी मैदानात उतरणे आणि हे चौघेही ऑलराउंडर असणे हा कमालीचा योगायोग पुण्याच्या मैदानात दिसून आला. टॉम, सॅम आणि हार्दिक मध्यमगती गोलंदाज आहेत तर क्रुणाल पांड्या फिरकीपटू आहे.  

IND vs ENG: भावाने भावाला दिली वनडे कॅप; कृष्णालाही 'प्रसिद्धी'

पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पांड्याला फलंदाजीमध्ये फार मोठी कामगिरी करता आली नाही. मात्र त्याच्या भावाने त्याच्या वाटणीच्या धावा काढाव्या अशी खेळी केली. त्याने 31 चेंडूत 58 धावा कुटल्या. इंग्लंडकडून गोलंदाजीवेळी सॅम कुरेन आणि टॉम कुरेन यांनी 10-10 षटकांचा कोटा पूर्ण केला. मात्र त्यांना एकही विकेट मिळाली नाही. सॅमने 43 धावा तर टॉमने 63 धावा खर्च केल्या. 


​ ​

संबंधित बातम्या