"भारत-इंग्लंड कसोटी मालिका तेंडुलकर-कूक ट्रॉफी नावाने खेळवायला हवी"

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 10 February 2021

पानेसरने यासंदर्भात केलेले ट्विट सोशल मीडिया चांगलेच व्हायरल होत आहे.अनेक क्रिकेट चाहते यावर व्यक्त होत असून इंग्लिश फिरकीपटूच्या मताशी सहमत असल्याचे अभिप्राय पाहायला मिळत आहेत.

IND vs ENG : इंग्लंड संघाचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने (Monty Panesar) ने अपल्या ट्विटर अकाउंटवर एक खास सल्ला दिलाय. त्याच्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिका सचिन तेंडुलकर आणि एलस्टर कुक यांच्या नावाखाली खेळवावी, असे त्याने म्हटले आहे. बीसीसीआय (BCCI) आणि  इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने यावर विचार करावा, असे पानेसरने म्हटले आहे. 

पानेसरने यासंदर्भात केलेले ट्विट सोशल मीडिया चांगलेच व्हायरल होत आहे.अनेक क्रिकेट चाहते यावर व्यक्त होत असून इंग्लिश फिरकीपटूच्या मताशी सहमत असल्याचे अभिप्राय पाहायला मिळत आहेत. फिरकीपटूने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की,  'भारत विरुद्ध इंग्लंड यांचीतल कसोटी मालिका तेंडुलकर-कुक ट्रॉफी या नावाने ओळखली गेली पाहिजे. दोघेही एकमेकांविरुद्ध खेळली असून दोघांचीही कामगिरी लक्षवेधी आहे, असा उल्लेख पानेसरने आपल्या ट्विटमध्ये केलाय. आपण सचिन तेंडुकरला क्रिकेटमधील एक दिग्गज चेहरा म्हणून पाहतो. पण आपल्याकडे त्याच्या नावाने कोणतीही मालिका नाही, असेही तो म्हणालाय.  

एकच फाईट वातावरण टाईट; पुरुषाला नमवत महिलेनं पटकावलं 1 मिलियनचं बक्षीस (VIDEO)

पानेसरच्या ट्विटवर काही हटके प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहे. थोडी प्रतिक्षा केली तर या मालिकेला कोहली रुट ट्रॉफी नाव दिल्याचे पाहायला मिळेले, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर एकाने या मालिकेला  कपिल देव आणि बॉथम यांच्या नाव द्यायला हवे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

ISL 2021 : 22 वय.. 21 मिनिटे.. 3 गोल.. 'काश्मिरी' पंडिताची कमाल! 

भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. चेन्नईच्या मैदानात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला होता. पाहुण्या इंग्लंडने 227 धावांनी सामना जिंकत मालिकेत विजय सलामी दिली. चेन्नईच्या मैदानात टीम इंडियाला 22 वर्षानंतचर पराभवाचा सामना करावा लागला होता.  


​ ​

संबंधित बातम्या