सेहवागने बोलंदाजीनं उडवल्या कोहलीच्या दांड्या

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 27 March 2021

हार्दिक पांड्या हा ब्रेकथ्रू मिळवून देण्यात पटाईत आहे, पण विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यात त्याचा उपयोगच करुन घेतला नाही.

भारतीय संघाचा (Indian Cricket Team) माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag)  दुसऱ्या वनडेत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजी न देण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात इतर गोलंदाज अपयशी ठरत असताना हार्दिक पांड्याच्या हाती चेंडू सोपवण्याची गरज होती, असे मत सेहवागने व्यक्त केले आहे. भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर 336 धावा केल्या होत्या.  या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी केली. प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत असताना कोहलीकडून जोडी फोडण्यासाठी काही विशेष रणनिती दिसली नाही. हार्दिक पांड्या हा ब्रेकथ्रू मिळवून देण्यात पटाईत आहे, पण विराट कोहलीने त्याचा उपयोगच दुसऱ्या सामन्यात केला नाही. 

INDvsENG : थर्ड अंपायरने स्टोक्सला दिले नॉट आउट, कोहली झाला नाराज

दुसऱ्या वनडे सामन्यातील पराभवानंतर विराट कोहलीने यासंदर्भात स्पष्टीकरणही दिले होते. हार्दिक पांड्याचा उपयोग करताना काळजी घेणेही गरजेचे आहे. टी-20 मध्ये त्याने गोलंदाजी केली होती. त्याच्या स्किलचा प्रयोग योग्य ठिकाणी करण्याची गरज आहे. भारतीय संघाला इंग्लंडमध्ये कसोटी खेळायची आहे. त्यावेळी तो फिट राहिला पाहिजे, असे विराट कोहलीने म्हटले होते. क्रिकबजच्या कार्यक्रमात सेहवागने भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या स्पष्टीकरणावर प्रतिक्रिया दिली.

INDvsENG : सक्सेसफुल DRS वर पंतला बाउंड्री का मिळाली नाही?

क्रिकेटच्या मैदानात फिल्डिंग करतानाही एखादा खेळाडू दुखापग्रस्त होऊ शकतो, असा टोमणा मारत हार्दिक पांड्याकडून 3-4 ओव्हर करुन घ्यायला पाहिजेत असे मत सेहवागने मांडले. पुढील काही महिने टीम इंडिया अधिक क्रिकेट खेळणार नाही, या मुद्यावरही सेहवागने जोर दिलाय. खेळाडू तुर्तास आयपीएलच खेळणार आहेत. वनडे सीरिजमध्ये पराभूत झालो तरी चालेल पण हार्दिकला लोड देणार नाही, असे कोहलीला म्हणायचे आहे का? असा सवालही सेहवागने उपस्थितीत केलाय. प्रत्येक गोलंदाजाला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत याचा अर्थ हार्दिक पांड्याकडून एकही ओव्हर टाकून घ्याची नाही, हे योग्य नाही. फिल्डिंगकरूनही त्याला थकवा जाणवतो, असा टोला सेहवागने या मुद्यावर लगावला. 


​ ​

संबंधित बातम्या