INDvsENG : थर्ड अंपायरने स्टोक्सला दिले नॉट आउट, कोहली झाला नाराज

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 26 March 2021

विकेटसंदर्भातील निर्णय 50-50 होता. त्यामुळे मैदानातील पंचांनी थर्ड अंपायरचा कॉल घेतला आणि बेन स्टोक्स नाबाद राहिला

India vs England, 2nd ODI : पुण्याच्या मैदानातील दुसऱ्या वनडेत भारतीय संघाने दिलेल्या 337 धावांचा पाठलाग सहज करत इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने बेन स्टोक्सच्या विकेटसाठी पंचासोबत हुज्जत घातल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली मैदानात कायमच आक्रमक अंदाजात दिसतो. मालिकेपूर्वी इंग्लंडचे माजी क्रिकेटर डेविड लॉयड यांनी विराट कोहली मैदानातील अंपायर्सवर दबाव तंत्राचा वापर करतो, असा आरोप केला होता. 

हिटमॅनची जबऱ्या फिल्डिंग; जेसनच्या 'रॉयल' खेळीला घातलं 'वेसण' (VIDEO)

दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली अंपायर्सच्या निर्णायवर नाराजी व्यक्त करताना दिसले.  थर्ड अंपायरने  बेन स्टोक्स (Ben Stokes) विरोधातील अपील फेटाळल्यानंतर त्यानेही नाराजी व्यक्त केली. इंग्लंडच्या डावातील 26 व्या षटकात भुवनेश्वरच्या पाचव्या चेंडूवर बेन स्टोक्सने दोन धावा घेतल्या. डिप मिडविकेटवर कुलदीपने चपळाई दाखवत चेंडू रिषभ पंतकडे फेकला. क्लॉज कॉलवर थर्ड अंपायरने बेन स्टोक्सला नाबाद दिले. यावर रन आउट कसे नाही? असा प्रश्न कोहली मैदानातील अंपायरला विचारतान दिसले. सहज क्रिजमध्ये पोहचेल असे वाटल्याने बेन स्टोक्स थोडो स्लो झाला होता. थ्रो आल्याचे लक्षात आल्याने स्टोक्सने हालचाली जलद करत बॅट क्रिजमध्ये टेकवली. विकेटसंदर्भातील निर्णय 50-50 होता. त्यामुळे मैदानातील पंचांनी थर्ड अंपायरचा कॉल घेतला आणि बेन स्टोक्स नाबाद राहिला. 

भारत-पाकमध्ये त्रयस्थ ठिकाणी टी-20 मालिका? दुबईतील बैठकीवर खिळल्या नजरा

रिप्लायमध्ये बेन स्टोक्स बाद असल्याचे वाटत होते. इंग्लिश टीमचे टेन्शनही वाढल्याचे दिसले. बेन स्टोक्सची बॅट लाईनवर होती त्यावेळी बेल्सची लाईट दिसून आली. ठोस निर्णय देणे शक्य नसल्यामुळे थर्ड अंपायरने फलंदाजाच्या बाजूने निर्णय दिला. यावेळी बेन स्टोक्स 28 चेंडूत 33 धावांवर खेळत होता. त्यानंतर 40 चेंडूत स्टोक्सने अर्धशतक झळकावले. गियर बदलत त्याने 52 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकाराच्या मदतीने 99 धावांची खेळी करत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 


​ ​

संबंधित बातम्या