INDvsENG : बदलाच्या प्रयोगात विराट-रोहित जोडी ठरली हिट

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 20 March 2021

पहिल्या सामन्यात लोकेश राहुल आणि शिखर धवन या जोडीने भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली होती. पहिल्या सामन्यात या दोघांनी केवळ दोन धावांची भागीदारी केली.

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक लढतीत टीम इंडियामध्ये पुन्हा एकदा बदलाचे प्रयोग दिसले. अवांतर गोलंदाज खेळवण्यासाठी सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला बाकावर बसवण्यात आले. लोकेश राहुलने या मालिकेत चौथ्या सामन्यात 14 ही सर्वोच्च धावसंख्या केली होती. त्याच्या जागी टी-नटराजनला संधी देण्यात आली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पहिल्यांदाच ओपनिंग केली. या जोडीने पहिल्या विकेसाठी 94 धावा केल्या. रोहित शर्मा  34 चेंडूत 64 धावांची आक्रमक खेळी करुन परतला. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत या जोडीने केलेली आतापर्यंतची सर्वोच्च सलामीची भागीदारी ठरली.  

या मालिकेत टीम इंडियाने प्रत्येक सामन्यात नव्या पीयर्ससह डावाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात लोकेश राहुल आणि शिखर धवन या जोडीने भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली होती. पहिल्या सामन्यात या दोघांनी केवळ दोन धावांची भागीदारी केली. दुसऱ्या सामन्यात ईशान किशन आणि लोकेश राहुल यांनी भारताच्या डावाला सुरुवात केली होती. या सामन्यात लोकेश राहुलला खातेही उघडता आले नव्हते. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात रोहित आणि लोकेश राहुल यांनी डावाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही सामन्यात अनुक्रमे 7 आणि 21 धाावांवर भारताने पहिली विकेट गमावली होती. 

पहिल्यांदाच किंग कोहली- हिटमॅन रोहितसोबत ओपनिंगला
 

गोलंदाजीतील ताकद वाढवण्यासाठी टीम इंडियामध्ये पाचव्या सामन्यात मोठा बदल करण्यात आला. नाणेफेकीनंतर विराट कोहलीने रोहितसोबत ओपनिंग करणार असल्याचे सांगितले. लोकेश राहुलच्या जागी टी नटराजन याला संधी दिल्याचेही त्याने स्पष्ट केले. रोहित-विराट यांनी एका वनेतील ओपनिंगनंतर पहिल्यांदाच टी-20 मध्ये भारतीय डावाला सुरुवात केली. ही जोडी शतकी भागीदारीकडे वाटचाल करत असताना बेन स्टोक्सने इंग्लंडला थोडा दिलासा दिला. रोहित शर्माच्या रुपात त्याने पहिले यश मिळवले. 


​ ​

संबंधित बातम्या