"मैदानात कोहली अंपायर्सचा अपमान करतो"

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 24 March 2021

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत डेविड मलान याने सुर्यकुमार यादवचा घेतलेला झेलसंदर्भातील निर्णय वादग्रस्त ठरला होता.

भारतीय संघ इंग्लंडचा धुव्वा उडवत असताना कर्णधार विराट कोहलीवर दिग्गज इंग्लिश क्रिकेटरने टीका केली आहे. विराट कोहली सामन्यादरम्यान अंपायर्सवर दबाव तंत्राचा वापर करताना दिसते. त्याचे मैदानातील हे वर्तन अपमानास्पद आहे, असेत डेविड लॉयड यांनी म्हटले आहे. मोका बघून विराट कोहली पंचांवर दबाव आणतो, असा उल्लेखही त्यांनी केलाय. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेदरम्यान कर्णधार कोहलीने सॉफ्ट सिग्नल नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत डेविड मलान याने सुर्यकुमार यादवचा घेतलेला झेलसंदर्भातील निर्णय वादग्रस्त ठरला होता. यावर नाराजी व्यक्त करताना विराट कोहलीने मैदानातील अंपायर्सला 'मला माहित नाही' असा प्रकारचा सिग्नल असायला हवा, असे मत कोहलीने व्यक्त केले होते. यावर देखील लॉयड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सॉफ्ट सिग्नलमध्ये अंपायरला जास्तीत जास्त अधिकार मिळतात, असे लॉयड यांनी म्हटले आहे.

INDvsENG : वन-डे इन पुणे! सामना दिसला नसेल; पण क्रिकेट प्रेम पुन्हा दिसलं  

लॉयडयांनी डेली मेलसाठी लिहिलेल्या कॉलममधून विराट कोहलीचा खरपूस समाचार घेतलाय. चौथ्या वनडे सामन्यात डेविड मलानने सुर्यकुमारचा झेल घेतला. त्यानंतर  इंग्लंडच्या संघाच्या दबावामुळे अंपायरने सॉफ्ट सिग्नलमध्ये सुर्याला आउट दिले, असे विराट कोहलीला वाटते.  पण सर्वात पहिल्यांदा सॉफ्ट सिग्नलच्या नियमामुळे अंपायरला अधिक अधिकार मिळतात हे समजून घ्यायला हवे. 

जोकोविचसोबत फ्लर्ट कर 51 लाख देतो; प्रसिद्ध मॉडेलला मिळाली होती ऑफर

इंग्लंडच्या संघाने अंपायरवर दबाव टाकला की नाही हे माहित नाही. पण संपूर्ण दौऱ्यात विराट कोहली अंपायरवर दबाव टाकून त्यांचा अपमान करत आलाय, असा उल्लेख डेविड लॉयड यांनी केला आहे. अंपायरचा अपमान करुन त्यांच्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रकार कोहलीकडून पाहायला मिळाला, असे ते म्हणाले आहेत. विराट कोहलीने नाराजी व्यक्त केलेल्या अंपायर्स कॉल नियमाचे लॉयड यांनी समर्थन केले आहे. कोहली परिणामाचा विचार करताना दिसत नाही. चेंडू स्पर्श झाल्यावर आउट दिले तर प्रत्येक कसोटी दोन दिवसांत संपेल आणि वनडेचा निकाल चार तासांत लागले. अँड्रसन, जोश हेजलवूड आणि बुमराह सारखे गोलंदाज आठ-आठ विकेट घेतली. असे म्हणत त्यांनी विराटच्या विरोधातील हवा काढण्याचा प्रयत्न केलाय. 


​ ​

संबंधित बातम्या