IND vs ENG : पिंक बॉलवर खेळण्यासाठी उमेश यादव फिट; BCCI ने शार्दुलला केलं रिलीज

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 22 February 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 4 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या मैदानात रंगणार आहे.

IND vs ENG Pink Ball Test In Ahmedabad : पिंक बॉल कसोटी सामन्यासाठी जगातील सर्वात मोठ्या मैदानावर उतरण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज उमेश यादव फिटनेस चाचणीत पास झाला असून त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी तो भारतीय संघाचा सदस्य असणार आहे. त्याचा भारतीय संघात समावेश झाल्यानंतर शार्दुल ठाकूरला विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज करण्यात आले आहे.  

राशीद खानच्या हेलीकॉप्टर शॉटवर इंग्लिश महिला क्रिकेटर झाली फिदा (VIDEO)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 4 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या मैदानात रंगणार आहे. उर्वरित दोन्ही सामने याच मैदानात होणार असून तिसरा सामना हा डे नाईट असून तो पिंक चेंडूवर खेळवण्यात येणार आहे. बुधवारपासून या सामन्याला सुरुवात होईल. 21 फेब्रुवारी रोजी उमेश यादवची फिटनेस चाचणी घेण्यात आली होती. तो फिट झाल्यावर उर्वरित सामन्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले.  

Vijay Hazare Trophy 2021 : मुंबईची ‘शॉ’नदार विजयी सलामी

भारतीय संघाने चेन्नईच्या मैदानातील दुसरा सामना 317 धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली होती. या सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. अहमदाबादच्या मैदानात बुमराहसह उमेश यादव जलदगती गोलंदाजांच्या रुपात खेळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तिसरा सामना जिंकून मालिकेतील आघाडी घेण्यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आपली दावेदारी भक्कम करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मोटेराच्या मैदानात उतरेल.

उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ :

विराट कोहली, (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल,  चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा(यष्टीरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल. वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव. 

 


​ ​

संबंधित बातम्या