INGvsENG : कृणाल पदार्पण करत आहे वाटलेच नाही : धवन

सुनंदन लेले, सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 March 2021

भारतीय क्रिकेटमध्ये झालेला हा बदल काय परिणाम साधतो आहे हे पहिल्या सामन्यात कृणाल पंड्या आणि प्रसिध कृष्णाने केलेल्या जबरदस्त पदार्पणातून समजून आले असेल.

पुणे : बऱ्याच दिवसांनी सामना खेळताना सुरुवातीला थोडा वेळ देणे, खेळपट्टीवर उभे राहणे गरजेचे होते आणि मी तेच केले. कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात दडपण असतेच कामगिरी करायचे. मला अशा दडपणाचा सामना कसा करायचा याचा अनुभव आहे. पहिल्या एक दिवसीय सामन्याचा सामनावीर शिखर धवनने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नवीन खेळाडूंच्या आत्मविश्वासपूर्ण खेळाचे कौतुक करताना शिखर धवन म्हणाला, आजच्या जमान्यातील खेळाडू स्थानिक क्रिकेट भरपूर खेळतात आणि त्यात चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना भारतीय ‘अ’ संघाकडून खेळायला मिळते आणि आयपीएलचा अनुभवही मिळतो. मग ते खेळाडू जगातील नामांकित प्रशिक्षकांकडून क्रिकेटचे बारकावे शिकतात आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळतात. मला वाटते की त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला आल्यावर दचकायला किंवा भांबावून जायला होत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये झालेला हा बदल काय परिणाम साधतो आहे हे पहिल्या सामन्यात कृणाल पंड्या आणि प्रसिध कृष्णाने केलेल्या जबरदस्त पदार्पणातून समजून आले असेल. 

"मैदानात कोहली अंपायर्सचा अपमान करतो"

भारतीय गोलंदाजांचे कौतुक करताना शिखरने सांगितले, प्रसिध कृष्णाने चांगलीच नेम धरून गोलंदाजी केली. एका षटकात जास्त धावा जाऊनही तो गडबडला नाही. त्याने वेगाने अचूक मारा केला. शार्दुल ठाकूरच्या खेळात लक्षणीय बदल झालाय तो म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आपल्या भात्यातील बाण केव्हा आणि कसे वापरायचे त्याला बरोबर कळते. शार्दुल अत्यंत चाणाक्ष गोलंदाज आहे. सामन्याची अवस्था काय आहे याचा शार्दुलचा अभ्यास, निरीक्षण जबरदस्त आहे.


​ ​

संबंधित बातम्या