IND vs ENG SG Ball Controversy : नाराज विराटला मिळाली अश्विनची साथ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 10 February 2021

एसजी बॉल भारतातील सामन्यात वापरला जातो. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत कूकाबुरा बॉलचा वापर केला जातो.  इंग्लंडमध्ये ड्यूक बॉलचा वापर होता.

IND vs ENG SG Ball Controversy : टीम इंडियाला सलामीच्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे कागदावर आणि ऑस्ट्रेलियन मैदानात मजबूत दिसलेल्या टीम इंडियातील उणीवा पहिल्या कसोटी सामन्यात दिसून आल्या. चेन्नईतील सामन्यात नाणेफेकीशिवाय आणखी एक मुद्दा भारतीय संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चा आता रंगण्यास सुरुवात झालीय. भारतीय मैदानात रंगणाऱ्या कसोटीमध्ये जो एसजी बॉल वापरण्यात येतो त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. कर्णधार विराट (Virat Kohli) ने पराभवाचे खापर एसजी बॉलवरही फोडले आहे. अश्विनने कर्णधाराच्या सूरात सुर मिसळल्याचे दिसते.

क्रिकेटमध्ये एसजी बॉल भारतीय मैदानात वापरण्यात येतो.  ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत कूकाबूरा बॉलचा वापर केला जातो. प्रामुख्याने भारतीय मैदानात रंगणाऱ्या सामन्यात एसजी बॉलची विशेष ओळख आहे. यावरच आता किंग कोहलीने प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलाय.  

May be an image of ball

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, सांसपारेल्स ग्रीनलँड्स (एसजी) ने भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेसाठी गडद रंगांचा बॉल तयार केला आहे. या बॉलच सीम (शिलाई धागा) अधिक बाहेर आहे. बॉलमध्ये करण्यात आलेव्या बदलावर कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे. एसजी बॉलचा स्तर पूर्वी असा नव्हता.  बॉल 60 षटकानंतर खराब होताना दिसते. कसोटीमध्ये असे व्हायलना नाही पाहिजे, असे विराटने म्हटले आहे. 
No photo description available.
विराट इच्छा!

भारतीय संघाच्या कर्णधाराने भारतीय मैदानात होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी ड्यूक बॉलचा वापर व्हायला हवा, अशी इच्छा दर्शवली आहे. भारतीय मैदानात एसजी बॉलची खास ओळख असताना आता ड्यूक बॉल भारी असल्याचे कर्णधाराचे म्हणने आहे. 2018 मध्ये त्याने पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थितीत केला होता.  चेन्नई कसोटीतील पराभवानंतर त्याने पुन्हा  ड्यूक बॉलचा वापर व्हायला हवा असे म्हटले आहे. क्रिकेटमध्ये सर्वत्र ड्यूक बॉलचा वापर व्हायला पाहिजे असे विराटला वाटते.

No photo description available.

बॉलमधील फरक काय? 

एसजी बॉल भारतातील सामन्यात वापरला जातो. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत कूकाबुरा बॉलचा वापर केला जातो.  इंग्लंडमध्ये ड्यूक बॉलचा वापर होता. कूकाबुरा बॉल आणि एसजी बॉल तयार करण्यात मोठा फरक आहे. एसजी बॉल हाताने तयार केला जातो. दुसरीकडे  कूकाबुरा मशीनमध्ये तयार केला जातो. त्यामुळे ड्यूक बॉलच्या तुलनेत एसजी बॉलचा आकार लवकर बदलतो. ड्यूक बॉल हा जलदगती गोलंदाजांना फायदेशीर ठरतो तर  एसजी बॉलवर फिरकीची जादू दिसते.   


​ ​

संबंधित बातम्या